मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : 'जुना' धोनी बघून कॅप्टन कोहली खूश! माहीची बॅटिंग बघून विराटने मारल्या उड्या

IPL 2021 : 'जुना' धोनी बघून कॅप्टन कोहली खूश! माहीची बॅटिंग बघून विराटने मारल्या उड्या

आयपीएल प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा आपलं जुनं रुप दाखवून दिलं. धोनीची ही खेळी पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) खूश झाला आहे. मॅच संपल्यानंतर विराटने लगेचच ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 11 ऑक्टोबर : आयपीएल प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा आपलं जुनं रुप दाखवून दिलं. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये (CSK vs DC Qualifier 1) धोनीने 6 बॉलमध्ये 18 रनची खेळी केली आणि चेन्नईला 9व्यांदा आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहोचवलं. धोनीची ही खेळी पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) खूश झाला आहे. मॅच संपल्यानंतर विराटने लगेचच ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे.

'राजा परत आलाय. जगातला सर्वोत्तम फिनिशर. पुन्हा एकदा माझ्या जागेवरून मी उड्या मारल्या,' असं ट्वीट विराट कोहलीने केलं आहे.

धोनी बॅटिंगला आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 11 बॉलमध्ये 24 रनची गरज होती. बॅटिंगला आल्यानंतर 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला धोनीला स्ट्राईक मिळाला. पहिल्याच बॉलला धोनीने एकही रन काढली नाही, पण आवेश खानच्या पुढच्या बॉलला त्याने सिक्स मारली. यानंतर 19 व्या ओव्हरचा अखेरच्या बॉलवरही धोनीला रन काढण्यात यश आलं नाही.

अखेरच्या ओव्हरला चेन्नईला विजयासाठी 13 रनची गरज होती आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉम करनच्या हातात बॉल दिला. पहिल्याच बॉलला करनने मोईन अलीची विकेट घेतली. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलला धोनीने फोर मारली. दबावात आलेल्या करनने पुढचा बॉल वाईड टाकला, त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा फोर मारून चेन्नईला आयपीएल फायनलमध्ये पोहोचवलं.

दिल्लीने दिलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. फाफ डुप्लेसिस 1 रनवर आऊट झाला. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी दिल्लीच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. रॉबिन उथप्पा 44 बॉलमध्ये 63 रन करून आऊट झाला.

दिल्लीला पराभूत करून चेन्नईची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. तर दिल्लीच्या टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी आहे. आरसीबी आणि कोलकाता यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल, ते दिल्लीविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळतील. या मॅचमध्ये जी टीम विजयी होईल ती फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळेल.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Virat kohli