मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, CSK vs DC : ऋषभ पंतने केली घोडचूक, गुरूला 'गिफ्ट' दिली मॅच!

IPL 2021, CSK vs DC : ऋषभ पंतने केली घोडचूक, गुरूला 'गिफ्ट' दिली मॅच!

आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वालिफायर (IPL 2021 Qualifier 1) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर (CSK vs DC) 2 बॉल आणि 4 विकेट राखून रोमांचक विजय मिळवला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने या दोन ओव्हर आवेश खान (Avesh Khan) आणि टॉम करनला (Tom Curran) दिल्या.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 11 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वालिफायर (IPL 2021 Qualifier 1) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर (CSK vs DC) 2 बॉल आणि 4 विकेट राखून रोमांचक विजय मिळवला आहे. एमएस धोनीने (MS Dhoni) 6 बॉलमध्ये 18 रनची खेळी करून दिल्लीच्या हातात आलेला विजयाचा घास हिरावून घेतला. चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी 24 रनची गरज होती. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने या दोन ओव्हर आवेश खान (Avesh Khan) आणि टॉम करनला (Tom Curran) दिल्या.

आवेश खानच्या 19 व्या ओव्हरला चेन्नईने 11 रन काढले तर टॉम करनने टाकलेल्या 20 व्या ओव्हरच्या पहिल्या 4 बॉलमध्येच धोनीने 13 रन काढून चेन्नईला विजय मिळवून दिला. या सामन्यात चेन्नईचा विजय झाला असला, तरी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याच्या रणनितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कागिसो रबाडाची (Kagiso Rabada) एक ओव्हर शिल्लक असतानाही पंतने अखेरची ओव्हर त्याला न देता टॉम करनला का दिली? असा सवाल विचारला जात आहे.

कागिसो रबाडा या सामन्यात 3 ओव्हरमध्ये 23 रन दिल्या होत्या, पण त्याला एकही विकेट घेण्यात यश आलं नव्हतं. तर टॉम करनने 3.4 ओव्हरमध्ये 29 रन देऊन चेन्नईच्या 3 विकेट घेतल्या होत्या. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) यानेही रबाडाला शेवटची ओव्हर का दिली नाही, याचं लॉजिक मला समजलं नाही, असं ट्वीट केलं.

धोनीने संपवली मॅच

धोनी बॅटिंगला आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 11 बॉलमध्ये 24 रनची गरज होती. बॅटिंगला आल्यानंतर 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला धोनीला स्ट्राईक मिळाला. पहिल्याच बॉलला धोनीने एकही रन काढली नाही, पण आवेश खानच्या पुढच्या बॉलला त्याने सिक्स मारली. यानंतर 19 व्या ओव्हरचा अखेरच्या बॉलवरही धोनीला रन काढण्यात यश आलं नाही.

अखेरच्या ओव्हरला चेन्नईला विजयासाठी 13 रनची गरज होती आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉम करनच्या हातात बॉल दिला. पहिल्याच बॉलला करनने मोईन अलीची विकेट घेतली. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलला धोनीने फोर मारली. दबावात आलेल्या करनने पुढचा बॉल वाईड टाकला, त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा फोर मारून चेन्नईला आयपीएल फायनलमध्ये पोहोचवलं.

चेन्नई फायनलमध्ये

दिल्लीला पराभूत करून चेन्नईची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. तर दिल्लीच्या टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी आहे. आरसीबी आणि कोलकाता यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल, ते दिल्लीविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळतील. या मॅचमध्ये जी टीम विजयी होईल ती फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळेल.

First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, Rishabh pant