IPL 2021 : CSK च्या सॅम करनचं Meme तूफान व्हायरल, सुरेश रैनानेही केलं ट्रोल

IPL 2021 : CSK च्या सॅम करनचं Meme तूफान व्हायरल, सुरेश रैनानेही केलं ट्रोल

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) याला त्याच्या वयावरून खूप वेळा ट्रोल करण्यात आलं. आता तर चेन्नई सुपरकिंग्समधलाच त्याचा सहकारी सुरेश रैना (Suresh Raina) याने एका मीमवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे : बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. असं असलं तरी चाहत्यांचं त्यांच्या टीमविषयीचं आणि खेळाडूंविषयीचं प्रेम सोशल मीडियावर ओथंबून वाहत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) याला त्याच्या वयावरून खूप वेळा ट्रोल करण्यात आलं. आता तर चेन्नई सुपरकिंग्समधलाच त्याचा सहकारी सुरेश रैना (Suresh Raina) याने एका मीमवर प्रतिक्रिया दिली आहे.

या मीममध्ये सुरेश रैना आणि सॅम करन यांचा एक फोटो शेयर करण्यात आला आहे. घरी जा आणि मन लावून अभ्यास कर, रस्त्यात कोणीही अनोळखी माणसाने चॉकलेट दिलं तर ते घेऊ नको, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं. या मीमवर सुरेश रैनाने हसणारी इमोजी टाकत कमेंट केली.

दुसरीकडे सॅम करन यानेही त्याच्या व्हायरल झालेल्या काही मीमवर प्रतिक्रिया दिली. चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून सॅम करनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सने धमाकेदार कामगिरी केली. 7 पैकी 5 सामने जिंकत चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली. रैनाने आयपीएलच्या या मोसमात 6 इनिंगमध्ये 24.60 च्या सरासरीने आणि 126.80 च्या स्टाईक रेटने 123 रन केल्या, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता.

रैना हा आयपीएल इतिहासातल्या सगळ्यात यशस्वी बॅट्समनपैकी एक आहे. सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैना तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये त्याने 33.07 च्या सरासरीने आणि 136.89 च्या स्ट्राईक रेटने 5,491 रन केले, यामध्ये 39 अर्धशतकांचा समावेश होता.

सॅम करनने आयपीएलच्या या हंगामात बॉलने चांगली कामगिरी केली. डावखुरा फास्ट बॉलर असणाऱ्या करनने 24.11 ची सरासरी आणि 16.67 च्या स्ट्राईक रेटने 9 विकेट घेतल्या.

Published by: Shreyas
First published: May 7, 2021, 7:52 PM IST

ताज्या बातम्या