मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : माही इज बॅक! धोनीचे सिक्स मैदानाबाहेर, पाहा VIDEO

IPL 2021 : माही इज बॅक! धोनीचे सिक्स मैदानाबाहेर, पाहा VIDEO

आयपीएलच्या (IPL 2021) गेल्या सिझनमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) या सिझनसाठी तयारी सुरु केली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा ट्रेनिंग कॅंम्प (Training Camp) सुरु झाला

पुढे वाचा ...

चेन्नई, 12 मार्च : आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या सिझनचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 9 एप्रिलला पहिली तर 30 मे रोजी अंतिम मॅच खेळवली जाणार आहे. आयपीएलच्या गेल्या सिझनमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) या सिझनसाठी तयारी सुरु केली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा ट्रेनिंग कॅंम्प (Training Camp) सुरु झाला असून खेळाडूंनी जोरदार सराव सुरु केला आहे. आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी काही चेन्नई सुपरकिंग्जच्या काही दिग्गजांनी निवृत्ती घेतली. यानंतर धोनीच्या टीमने लिलावात काही खेळाडूंना विकत घेतलं.

आयपीएल सुरु होण्यास एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सीएसकेचा कॅप्टन आणि खेळाडूंनी सरावासाठी कंबर कसली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार मागील सिझन विसरुन पूर्ण जोशात तयारीला लागला आहे. मागच्या वर्षी इतिहासात प्रथमच चेन्नई सुपर किंग्ज प्ले ऑफमध्ये पोहचू शकली नव्हती. त्यामुळे या मोसमात टीम जोरदार पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी खेळाडूंनी ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होण्यास प्राधान्य दिलं आहे. याच बरोबर धोनी देखील आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे.

चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडीयममध्ये (चेपॉक) महेंद्रसिंग धोनी आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी आणि टीमला परत एकदा चॅम्पियनशीप मिळवून देण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करताना दिसत आहे. नुकताच चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्यात धोनी प्रॅक्टीसदरम्यान जोरदार सिक्स मारताना दिसून येत आहे. याचे कॅप्शन होते, माहि ऑल द वे...थाला...व्हिसलपोडू...यलो लव्ह.

आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आपला विशेष प्रभाव पाडू शकले नव्हते. तसेच धोनी देखील या सिझनमध्ये अपयशी ठरला होता. धोनीने 14 मॅचेसमध्ये 25 च्या सरासरीने 116.27 स्ट्राईक रेटनं 200 रन्स बनवले होते. जर चेन्नईला या सिझनमध्ये परतत जोरदार कामगिरी करायची असेल तर त्यासाठी धोनीचा फॉर्म ही महत्वाची गोष्ट आहे. आयपीएलचा लिजेंड धोनी याने या स्पर्धेत आतापर्यंत 136.75 या स्ट्राईक रेटने 4632 रन्स बनवले आहेत. यात 23 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे सुरेश रैना (Suresh Raina) आयपीएल 2020 मध्ये खेळू शकला नव्हता, त्यामुळे तो देखील यंदाची आयपीएल संस्मरणीय बनवू इच्छितो.

First published:

Tags: Cricket, Csk, IPL 2021, MS Dhoni, Social media viral, Sports, Video viral