मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : धोनीकडे आधीच तयार होता हर्षल पटेलच्या बॉलिंगचा 'प्लान', जडेजाचा खुलासा

IPL 2021 : धोनीकडे आधीच तयार होता हर्षल पटेलच्या बॉलिंगचा 'प्लान', जडेजाचा खुलासा

रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) ऑलराऊंड कामगिरीमुळे चेन्नई सुपरकिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (CSK vs RCB) 69 रनने पराभव केला.

रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) ऑलराऊंड कामगिरीमुळे चेन्नई सुपरकिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (CSK vs RCB) 69 रनने पराभव केला.

रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) ऑलराऊंड कामगिरीमुळे चेन्नई सुपरकिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (CSK vs RCB) 69 रनने पराभव केला.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 26 एप्रिल : रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) ऑलराऊंड कामगिरीमुळे चेन्नई सुपरकिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (CSK vs RCB) 69 रनने पराभव केला. वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात जडेजाने पहिले 28 बॉलमध्ये 62 रन केले, यानंतर बॉलिंग करताना त्याने 13 रन देऊन 3 विकेट घेतल्या आणि एक रन आऊटही केला. तीन वेळची चॅम्पियन असलेल्या चेन्नईने यामुळे मोसमातला चौथा विजय मिळवला, तर बँगलोरचा यावेळचा हा पहिलाच पराभव होता. जडेजाने हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 5 सिक्स आणि एक फोर मारला.

मॅच संपल्यानंतर रविंद्र जडेजाने एमएस धोनीने (MS Dhoni) हर्षल पटेलच्या (Harshal Patel) बॉलिंगबाबत काय सांगितलं होतं याबाबत खुलासा केला. रविवारी दुपारी झालेल्या या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 191 रन करता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून फक्त 122 रन केले. या विजयासोबतच चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

'मी शेवटच्या ओव्हरमध्ये बॉल हिट करण्याचा विचार करत होतो. धोनीने मला आधीच सांगितलं होतं, हर्षल पटेल ऑफ स्टम्पवर बॉलिंग करेल, त्यामुळे मी तयार होतो. माझ्या बॅटला बॉल बरोबर लागत होता, त्यामुळे आम्हाला एवढा स्कोअर करता आला. शेवटची ओव्हर आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. जर मी स्ट्राईकवर राहिलो, तर जास्त रन काढू शकतो, हे मला माहिती होतं. या कामगिरीमुळे मी खूश आहे,' अशी प्रतिक्रिया जडेजाने दिली.

'मी आज खेळाची मजा घेतली. जेव्हा तुम्ही टीमच्या विजयात महत्त्वाचं योगदान देता तेव्हा चांगलं वाटतं. मैदानात कमाल करण्यात आज मला यश आलं. ट्रेनिंग करताना मी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगवर एकत्र कधीच काम करत नाही. मी एक दिवस स्वत:च्या प्रतिभेवर आणि दुसऱ्या दिवशी फिटनेसवर काम करतो,' असं जडेजाने सांगितलं.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Ravindra jadeja, RCB