Home /News /sport /

IPL 2021 : CSK च्या पराभवाचं कोच फ्लेमिंगने सांगितलं कारण, दिलं मुंबई इंडियन्सचं उदाहरण

IPL 2021 : CSK च्या पराभवाचं कोच फ्लेमिंगने सांगितलं कारण, दिलं मुंबई इंडियन्सचं उदाहरण

चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही (IPL 2021) खराब सुरूवात झाली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) मॅचमध्ये त्यांचा 7 विकेटने पराभव झाला. यानंतर चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी टीमच्या खराब कामगिरीवर भाष्य केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 एप्रिल : चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही (IPL 2021) खराब सुरूवात झाली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) मॅचमध्ये त्यांचा 7 विकेटने पराभव झाला. यानंतर चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी टीमच्या खराब कामगिरीवर भाष्य केलं आहे. जॉस हेजलवूडला (Josh Hazelwood) गमावणं टीमसाठी मोठा धक्का होतं, कारण ऑस्ट्रेलियाचा जेसन बेहरनडॉर्फ (Jason Beherendroff) आणि दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) पुढच्या सामन्यासाठीही उपलब्ध नसल्यामुळे टीमकडे परदेशी फास्ट बॉलरचा पर्याय नसल्याचं फ्लेमिंग म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जॉस हेजलवूडने शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतली. बेहरनडॉर्फला त्याचा पर्याय म्हणून टीममध्ये घेण्यात आलं, पण तो अजूनपर्यंत पोहोचू शकला नाही. तर लुंगी एनगिडी पाकिस्तानविरुद्धची वनडे सीरिज मध्येच सोडून आला, पण तो अजूनही क्वारंटाईन आहे. दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फ्लेमिंग म्हणाले, 'एनगिडी उपलब्ध नाही, पुढच्या सामन्यामध्येही तो खेळणार नाही. त्यामुळे जॉस हेजलवूड नसणं मोठा धक्का होतं. एनगिडी लवकरच पोहोचेल, पण बेहरनडॉर्फ त्यानंतरच येईल. बॉलिंगमध्ये आमच्याकडे पर्याय कमी आहेत. आमच्याकडे भारतीय बॉलर आहेत आणि आंतरराष्ट्रीय बॉलर म्हणून सॅम करन आहे.' चेन्नईने ठेवलेल्या 189 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्यात शतकीय पार्टनरशीप झाली, त्यामुळे दिल्लीने हे आव्हान 3 विकेट गमावून पूर्ण केलं. कोरोना व्हायरसमुळे यावर्षीची आयपीएल 6 ठिकाणी खेळवण्यात येत आहे. तसंच कोणत्याही टीमचा सामना त्यांच्या घरच्या मैदानात होणार नाही. 'शुक्रवारी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बँगलोरने मुंबईचा (Mumbai Indians vs RCB) पराभव केला. मुंबईलाही चेन्नईतल्या परिस्थितीमध्ये स्वत:ला ढाळण्यासाठी संघर्ष करावा लागला. टीमना तटस्ठ ठिकाणी खेळताना टीम संतुलनाची पद्धत शोधून काढावी लागेल,' अशी प्रतिक्रिया फ्लेमिंग यांनी दिली. रैनाने (Suresh Raina) या सामन्यात 36 बॉलमध्ये 54 रनची खेळी करत धमाकेदार पुनरागमन केलं. आयपीएलच्या मागच्या मोसमात सुरेश रैना स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच युएईमधून भारतात परत आला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या