• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : 6 महिन्यांमध्ये असं बदललं CSK चं नशीब, काय होती पडद्यामागची रणनीती?

IPL 2021 : 6 महिन्यांमध्ये असं बदललं CSK चं नशीब, काय होती पडद्यामागची रणनीती?

आयपीएलच्या मागच्या मोसमात संघर्ष करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सचं (CSK) नशीब यंदा (IPL 2021) मात्र पालटलं आहे. प्रमुख खेळाडू जोडले गेल्यामुळे आणि खेळाच्या पद्धतीमध्ये बदल केल्यामुळे यंदा चांगले निकाल लागले असल्याचं मत चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी मांडलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 एप्रिल : आयपीएलच्या मागच्या मोसमात संघर्ष करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सचं (CSK) नशीब यंदा (IPL 2021) मात्र पालटलं आहे. प्रमुख खेळाडू जोडले गेल्यामुळे आणि खेळाच्या पद्धतीमध्ये बदल केल्यामुळे यंदा चांगले निकाल लागले असल्याचं मत चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी मांडलं आहे. तीनवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नईने यावर्षी लागोपाठ तीन सामने जिंकले आहेत, तसंच पॉईंट्स टेबलमध्येही ते पहिल्या क्रमांकावर आहेत. सहा महिन्यांपूर्वी युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्सला इतिहासात पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. 'तीनपैकी तीन सामन्यांमध्ये विजय अपेक्षेपेक्षा चांगला आहे. आम्ही पाचपैकी तीन मॅचमध्ये विजयाची अपेक्षा ठेवली होती. जर आम्ही पुढच्या दोन मॅचमध्ये विजय मिळवला तर चांगलं होईल,' असं फ्लेमिंग कोलकात्याविरुद्धच्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. 'आम्ही ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, त्याचा आम्हाला अभिमान आहे. सॅम करनने मागच्या वर्षीचा फॉर्म कायम ठेवला आहे. मोईन अलीनेही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत स्वत:च्या भूमिकेला न्याय दिला आहे. आम्ही काही खेळाडूंना टीममध्ये घेतलं, ज्यामुळे हे शक्य झालं, पण खेळाची पद्धत बदलणं मुख्य कारण आहे,' अशी प्रतिक्रिया फ्लेमिंग यांनी दिली. याआधी पहिल्या सामन्यानंतर स्टीफन फ्लेमिंग यांनी मोईन अलीचं कौतुक केलं होतं. मोईन अलीच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे टीमला मजबुती मिळाली आहे, याची कमी आम्हाला मागच्या वर्षी जाणवत होती. ज्याची आम्हाला गरज होती, ते आम्हाला यंदा मिळालं. मोईन अलीने जशी सुरुवात केली, ते पाहून मी खूश आहे, असं फ्लेमिंग म्हणाले. 'टीमचा खेळ बघून मी उत्साहित आहे. आमच्याकडे जेवढी साधनं आहेत, त्यांचा भरपूर उपयोग करून आम्ही विरोधी टीमला आव्हान देत आहोत. आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळत आहोत,' असं फ्लेमिंग यांना वाटतं.
  Published by:Shreyas
  First published: