मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : श्रीलंकेचा नवा 'मलिंगा', धोनीची नजर पडताच चेन्नईत बोलावलं

IPL 2021 : श्रीलंकेचा नवा 'मलिंगा', धोनीची नजर पडताच चेन्नईत बोलावलं

एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने (CSK) आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमाच्या तयारीला सुरूवात केली आहे. यासाठी त्यांनी श्रीलंकेच्या दोन खेळाडूंना बोलावलं आहे.

  • Published by:  Shreyas

चेन्नई, 12 मार्च : एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने (CSK) आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमाच्या तयारीला सुरूवात केली आहे. धोनीसह अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड यांच्यासह अनेक खेळाडू चेन्नईला पोहोचले आहेत. पाच दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर खेळाडूंच्या ट्रेनिंग कॅम्पला सुरूवात झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा मागचा मोसम युएईमध्ये खेळवण्यात आला होता. त्या मोसमात चेन्नईची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सातव्या क्रमांकावर राहिली, तसंच आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला नाही. यावर्षी मात्र चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावामध्ये चेन्नईने मोईन अली, कृष्णप्पा गौतम, आणि चेतेश्वर पुजारा या खेळाडूंवर बोली लावली. याशिवाय आता चेन्नईने श्रीलंकेच्या दोन फास्ट बॉलरना ट्रेनिंग कॅम्पमध्ये मदतीसाठी बोलावलं आहे. महीष तीक्ष्णा (Maheesh Theekshana) आणि मथिषा पथिराणा (Matheesha Pathirana) यांना चेन्नईमध्ये बोलावण्यात आलं आहे.

श्रीलंकेची न्यूज साईट न्यूजवायरने दिलेल्या वृत्तानुसार हे दोन्ही खेळाडू चेन्नईची मदत करतील, पण हे खेळाडू टीमचा भाग नसतील. नव्या मोसमाच्या आधी दोन्ही खेळाडू चेन्नईच्या बॅट्समनची मदत करतील. पथिराणाला श्रीलंकेचा नवा मलिंगा म्हणलं जातं. त्याची बॉलिंग ऍक्शनही मलिंगासारखीच आहे. मागच्या वर्षी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये पथिराणा त्याचा वेग आणि ऍक्शनमुळे चर्चेत आला होता.

चेन्नईच्या नेटमध्ये पथिराणाला धोनी, रायुडू, सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि फाफ डुप्लेसिस यांच्यासारख्या बॅट्समनना बॉलिंग करायची संधी मिळेल. श्रीलंकेचे हे दोन्ही बॉलर रिझर्व्ह खेळाडू असतील. ऑफ स्पिनर असलेल्या महीषने श्रीलंकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. लंकन प्रिमीयर लीगमध्ये तो जाफना स्टालियन्सकडून खेळला. तर दुसरीकडे पथिराणा फास्ट बॉलर आहे. या दोघांनी एनओसी मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. एनओसी मिळाल्यानंतर हे दोन्ही खेळाडू भारतासाठी रवाना होतील. चेन्नई त्यांची पहिली मॅच 10 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर खेळेल.

First published:

Tags: Cricket news, Csk, IPL 2021, MS Dhoni, Sports, Sri lanka