Home /News /sport /

IPL 2021 : या बॉलरला घाबरून धोनी मागे पळाला, पाहा किती लांब गेला स्टम्प

IPL 2021 : या बॉलरला घाबरून धोनी मागे पळाला, पाहा किती लांब गेला स्टम्प

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) जोरदार तयारी करत आहे, जिकडे तो चेन्नई सुपरकिंग्जचं (CSK) नेतृत्व करणार आहे.

    चेन्नई, 18 मार्च : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) जोरदार तयारी करत आहे, जिकडे तो चेन्नई सुपरकिंग्जचं (CSK) नेतृत्व करणार आहे. सीएसकेला चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्याचा धोनीचा प्रयत्न असेल, त्यासाठी धोनी आणि सीएसकेचे इतर खेळाडू चेन्नईमध्ये सराव करत आहेत 9 एप्रिल ते 30 मेपर्यंत आयपीएलचं आयोजन होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे या वर्षी आयपीएल तटस्थ ठिकाणी होणार आहे, त्यामुळे कोणत्याही टीमला घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा मिळणार नाही. चेन्नई सुपरकिंग्जने त्यांच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, तसंच 22 वर्षांचा फास्ट बॉलर हरीशंकर रेड्डी (Harishankar Reddy) याचं कौतुक होत आहे. या व्हिडिओमध्ये हरीशंकर रेड्डीच्या बॉलिंगवर एमएस धोनी मागच्या बाजूला पळत आहे आणि बॉल स्टम्पला लागत आहे. एमएस धोनीचं अशाप्रकारे आऊट होणं, त्याच्या चाहत्यांना मात्र रुचलेलं नाही. हा व्हिडिओ सराव सत्रातला असला तरी हरीशंकरचं मात्र कौतुक केलं जात आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात चेन्नईने हरीशंकर रेड्डीला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं. स्थानिक क्रिकेटमध्ये हरीशंकर रेड्डीने 2018 साली आंध्र प्रदेशकडून पदार्पण केलं. तेव्हापासून तो 13 टी-20 खेळला, यात 8.34 चा इकोनॉमी रेटने आणि 19.3 च्या सरासरीने त्याने 19 विकेट घेतल्या. याचसोबत त्याने 5 लिस्ट ए मॅचमध्ये 8 विकेटही मिळवल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या