IPL 2021, CSK vs PBKS : चेन्नईला सूर गवसला, पंजाबवर दणदणीत विजय

IPL 2021, CSK vs PBKS : चेन्नईला सूर गवसला, पंजाबवर दणदणीत विजय

एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्सला (CSK) अखेर आयपीएलमध्ये (IPL 2021) सूर गवसला आहे. आयपीएलच्या पंजाब किंग्सविरुद्धच्या (Punjab Kings) सामन्या चेन्नईचा 6 विकेटने विजय झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्सला (CSK) अखेर आयपीएलमध्ये (IPL 2021) सूर गवसला आहे. आयपीएलच्या पंजाब किंग्सविरुद्धच्या (Punjab Kings) सामन्या चेन्नईचा 6 विकेटने विजय झाला आहे. पंजाबने ठेवलेलं 107 रनचं आव्हान चेन्नईने 4 विकेट आणि 26 बॉल राखून पूर्ण केलं. मोईन अलीने (Moeen Ali) सर्वाधिक 46 रन, तर फाफ डुप्लेसिसने (Faf Duplesis) नाबाद 33 रन केले. पंजाबकडून मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 2 विकेट घेतल्या, तर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि मुरुगन अश्विनला (Murugan Ashwin) 1-1 विकेट घेण्यात यश आलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला चेन्नईचा हा पहिलाच विजय आहे.

त्याआधी शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 47 रनच्या खेळीने प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्सची (Punjab Kings) लाज राखली. चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या (CSK) या सामन्यात पंजाबला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 106 रन करता आले. शाहरुख खानने 36 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 47 रन केले. चेन्नईकडून दीपक चहर सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. चहरने 4 ओव्हरमध्ये 13 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर सॅम करन, मोईन अली आणि ड्वॅन ब्राव्हो यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नईचा पराभव केला होता, तर राजस्थानविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात पंजाबचा विजय झाला होता. संजू सॅमसनच्या (Sanju Samson) वादळी शतकानंतरही पंजाबला विजय मिळवण्यात यश आलं होतं.

Published by: Shreyas
First published: April 16, 2021, 7:11 PM IST

ताज्या बातम्या