मुंबई, 6 मार्च : जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या IPL चा 14 वा मोसम (14th season) 9 एप्रिलपासून (9 April) सुरू होईल, असं वृत्त आहे. एएनआयने (ANI) दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलची तारीख निश्चित झाली आहे, आता फक्त आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या (IPL Governing Council) बैठकीत याला मंजुरी (permission) मिळायची बाकी आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची फायनल 30 मे (30 May) रोजी खेळवली जाईल. आयपीएलच्या या वेळापत्रकावर पुढच्या आठवड्यात शिक्कामोर्तब होऊ शकतं.
'आम्ही गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकींबाबत निर्णय घेत नाही. पण आम्ही 9 एप्रिलपासून स्पर्धेला सुरूवात करण्याचा आणि 30 मे रोजी फायनल खेळवण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही. पुढच्या आठवड्यात आयपीएलची ठिकाणं आणि वेळापत्रकाबाबत चित्र स्पष्ट होईल,' असं गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने सांगितलं.
सुरुवातीला आयपीएलचं मुंबई-पुण्यात (Mumbai - Pune) आयोजन केलं जाईल, असं सांगितलं जात होतं. पण महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता, याबाबत साशंकता निर्माण झाली. यानंतर अहमदाबाद, चेन्नई, बँगलोर, दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत (Ahmedabad, Chennai, Bangalore, Delhi, Kolkata and Mumbai) आयपीएलचं आयोजन करण्याबाबत बीसीसीआय आग्रही आहे, असं सांगण्यात आलं. मुंबईत सामने खेळवण्यासाठी आयपीएल अधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेटही घेतली.
भारत-इंग्लंड सीरिजप्रमाणेच (Ind vs England series) आयपीएलमध्येही 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाईल, असं बोललं जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई आणि अहमदाबादच्या टेस्टमध्ये 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली होती. मुंबईमध्ये मात्र स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळेल का नाही, याबाबत काहीही स्पष्ट झालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, IPL 2021, Sports