मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : वडिलांना झाला कोरोना, आणखी एक खेळाडू सोडणार आयपीएल

IPL 2021 : वडिलांना झाला कोरोना, आणखी एक खेळाडू सोडणार आयपीएल

कोरोनाच्या संकटात (Corona Virus) सुरू असलेल्या आयपीएलमधून (IPL 2021) आणखी एका खेळाडूने माघार घेतली आहे. आयपीएलच्या कॉमेंट्री टीममधून भारताचा माजी फास्ट बॉलर आरपी सिंग (RP Singh) घरी परतणार आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 28 एप्रिल : कोरोनाच्या संकटात (Corona Virus) सुरू असलेल्या आयपीएलमधून (IPL 2021) आणखी एका खेळाडूने माघार घेतली आहे. आयपीएलच्या कॉमेंट्री टीममधून भारताचा माजी फास्ट बॉलर आरपी सिंग (RP Singh) घरी परतणार आहे. आरपीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या कॉमेंटेटर्सच्या बायो-बबलमधून आरपी सिंग बाहेर पडणार आहे.

2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणारा आरपी सिंग स्टार स्पोर्ट्ससोबत करारबद्ध आहे. आयपीएलच्या हिंदी कॉमेंट्री टीमचा तो भाग आहे. खेळाडूंसोबतच कॉमेंटेटर्स आणि ब्रॉडकास्टर्सही बायो-बबलमध्ये आहेत.

आकाश चोप्रा, निखील चोप्रा, अजित आगरकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, गौतम गंभीर, सुनिल गावसकर आणि दीप दासगुप्ता हे हिंदी कॉमेंट्री टीमचा भाग आहेत. वडिलांनी कोरोनावर मात केल्यानंतर आरपी सिंग पुन्हा एकदा कॉमेंटेटर्सच्या बायो-बबलमध्ये येऊ शकतो, पण याबाबत अजून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

आरपी सिंगच्या आधी रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) यानेही आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. अश्विनच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याने पुढची स्पर्धा न खेळण्याचं ठरवलं. याचसोबत राजस्थान रॉयल्सचा लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone), एन्ड्रयू टाय (Andrew Tye) तसंच आरसीबीचे एडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांनीही कोरोनाच्या भीतीने माघार घेतली.

मागच्या 7 दिवसांमध्ये भारतात दिवसाला तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणारी विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळेही काही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्पर्धा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली विमानसेवा 15 मे पर्यंत बंद करण्यात आली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Cricket, IPL 2021