IPL 2021 : आयपीएलसाठी हा खेळाडू टेस्ट सोडण्यासाठीही तयार

IPL 2021 : आयपीएलसाठी हा खेळाडू टेस्ट सोडण्यासाठीही तयार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी आयपीएलला (IPL 2021) प्राधान्य दिलं तर अनेकवेळा खेळाडूंवर टीकेची झोडही उठवली जाते. पण इंग्लंडचा क्रिकेटपटू क्रिस वोक्स (Chris Woakes) याने आयपीएल खेळण्याची इच्छा वर्तवली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : आयपीएल का आंतरराष्ट्रीय क्रिकेट यापैकी एकाची निवड करताना अनेकवेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना तारेवरची कसरत करावी लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी आयपीएलला (IPL 2021) प्राधान्य दिलं तर अनेकवेळा खेळाडूंवर टीकेची झोडही उठवली जाते. पण इंग्लंडचा क्रिकेटपटू क्रिस वोक्स (Chris Woakes) याने आयपीएल खेळण्याची इच्छा वर्तवली आहे. दिल्लीची टीम आयपीएलच्या फायनलला पोहोचली तर क्रिस वोक्स एक टेस्ट खेळू शकणार नाही. भारतात यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) तयारीसाठी आयपीएल महत्त्वाची असल्याचं मत वोक्स याने मांडलं आहे.

मागच्या मोसमात वैयक्तिक कारणांमुळे वोक्स आयपीएल खेळला नव्हता, तरीही दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) त्याला टीममध्ये कायम ठेवलं. भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही तो रोटेशन पॉलिसीमुळे खेळू शकला नाही. मागच्या मोसमात युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये दिल्लीची टीम फायनलला पोहोचली होती.

इंग्लंड 2 जूनपासून लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध पहिली टेस्ट खेळणार आहे. तर आयपीएल फायनल 30 मे ला होणार आहे. जर मी दिल्लीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये नसेन तर मी प्रशिक्षक रिकी पॉण्टिंगशी (Ricky Pointing) बोलेन. मला लॉर्ड्सवर खेळायची इच्छा आहे, पण टेस्टचे वेळापत्रक नंतर बनवण्यात आल्याचं वोक्स म्हणाला.

2015 नंतर वोक्स इंग्लंडच्या टी-20 टीममध्ये खेळला नाही. 'मी करियरच्या अशा ठिकाणी आहे जिकडे वारंवार संधी मिळत नाही. यासाठी मला टेस्ट सोडावी लागू शकते. दिल्लीच्या टीमने माझ्यावर विश्वास दाखवला, याची परतफेड मला करावी लागणार आहे. आयपीएलमधून मी नेहमीच शिकलो आहे आणि मला वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या टीममध्ये जागा मिळवायची आहे,' असं वक्तव्य वोक्सने केलं.

याआधी बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) यानेही श्रीलंकेविरुद्धची टेस्ट सीरिज खेळण्याऐवजी आयपीएलला प्राधान्य दिलं. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजचा निकाल काहीही लागला तरी बांगलादेशची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) प्रवेश मिळवू शकणार नाही. त्याऐवजी आयपीएल खेळली तर भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी तयारी करता येईल, असं मत शाकिब अल हसनने मांडलं. शाकिब यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळणार आहे.

Published by: Shreyas
First published: March 25, 2021, 6:57 PM IST

ताज्या बातम्या