• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : मुंबईविरुद्धच्या विजयानंतर गेलने मारला बॉलिवूडचा फिल्मी डायलॉग, म्हणाला...

IPL 2021 : मुंबईविरुद्धच्या विजयानंतर गेलने मारला बॉलिवूडचा फिल्मी डायलॉग, म्हणाला...

केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्सने (Punjab Kings) शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 9 विकेट आणि 14 बॉल राखून दारूण पराभव केला. राहुल आणि क्रिस गेल (Chris Gayle) यांच्या नाबाद खेळीमुळे पंजाबने अगदी सहज विजय मिळवला.

 • Share this:
  चेन्नई, 24 एप्रिल : केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्सने (Punjab Kings) शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 9 विकेट आणि 14 बॉल राखून दारूण पराभव केला. या सामन्यात राहुलने मुंबईला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं, यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 63 रनच्या खेळीनंतरही मुंबईला फक्त 131 रनच करता आले. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 17.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला. मॅन ऑफ द मॅच केएल राहुलने 52 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नाबाद 60 रन केले. तर क्रिस गेलने (Chris Gayle) 35 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्स मारून नाबाद 43 रनची खेळी केली. आयपीएलच्या सगळ्यात यशस्वी टीमचा पराभव केल्यानंतर क्रिस गेलने 'मोगॅम्बो खुश हुआ', हा बॉलिवूड चित्रपटाचा डायलॉग म्हणला. पंजाब किंग्सने क्रिस गेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. मिस्टर इंडिया या चित्रपटात आमरिश पुरी यांनी हा डायलॉग म्हणला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या बॉलरनी चमकदार कामगिरी केली. मोहम्मद शमी आणि रवी बिष्णोई यांनी 4 ओव्हरमध्ये 21 रन देऊन 2-2 विकेट घेतल्या. दीपक हुड्डा आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या विजयानंतर पंजाब पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
  Published by:Shreyas
  First published: