• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ठरलं! IPL 2021 बाबत सौरव गांगुलीची महत्त्वाची घोषणा

ठरलं! IPL 2021 बाबत सौरव गांगुलीची महत्त्वाची घोषणा

बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आयपीएल 2021 (IPL 2021) बाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन भारतात होणार नाही, असं सौरव गांगुलीने स्पष्ट केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आयपीएल 2021 (IPL 2021) बाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन भारतात होणार नाही, असं सौरव गांगुलीने स्पष्ट केलं आहे. पण आयपीएलचं आयोजन कधी होईल, हे एवढ्या घाईने सांगता येणार नाही, असं त्याने सांगितलं. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने 29 सामन्यांनंतर आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पुढचे 31 सामने झाले नाहीत, तर बोर्डाचं जवळपास 2500 कोटी रुपयांचं नुकसान होईल. स्पोर्ट्सस्टारशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, 'खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन होणं त्रासदायक ठरत आहे. आयपीएलचं आयोजन कधी होईल, हे सांगणं मुश्कील आहे, पण इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि युएई स्पर्धेचं आयोजन करण्याच्या रेसमध्ये आहेत.' 'मागच्या एका वर्षापासून आपण कोरोनामुळे त्रासलेलो आहोत. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 आम्ही संघर्ष करत आहोत. सगळ्याच जणांना संघर्ष करावा लागत आहे, त्यामुळे क्रिकेटही वेगळं नाही. मागच्यावर्षी आयपीएलचं युएईमध्ये आयपीएलचं आयोजन करणं आव्हानात्मक होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळं काही खराब झालं. या काळात क्रिकेट स्पर्धा आयोजित करणं किती कठीण आहे, हे तुम्ही समजू शकता,' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. 'आम्ही बायो-बबल बनवलं आणि नियमांचं पालनही केलं. सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली, त्यामुळे आम्ही महिला क्रिकेट, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीचं आयोजन यशस्वीरित्या केलं. आम्ही ज्युनियर क्रिकेटचंही प्लानिंग करणार होतो, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आमच्याकडे कमी संधी होती, म्हणूनच आम्ही ही स्पर्धा रद्द केली,' असं वक्तव्य गांगुलीने केलं.
  Published by:Shreyas
  First published: