पटणा, 29 मार्च : क्रिकेटच्या मैदानात बिहारमधून बरेच कमी खेळाडू दिसतात. मागच्या काही दिवसांमध्ये इशान किशनने (Ishan Kishan) इंग्लंडविरुद्धच्या आपल्या पहिल्याच टी-20 मध्ये धमाकेदार अर्धशतक करून स्वत:ला सिद्ध केलं. यानंतर आता बिहारमधूनच आणखी एक खेळाडू त्याच्या गतीने अनेकांना प्रभावित करत आहे. जमुईच्या मल्लेहपूरचा रहिवासी असलेला हर्ष विक्रम सिंग (Harsh Vikram Singh) फास्ट बॉलर आहे. 25 वर्षांचा हा युवा खेळाडू बॅटिंगही चांगली करतो.
6 फूट 3 इंचाचा हर्ष विक्रम सिंग आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत (Delhi Capitals) आहे. हर्ष विक्रमच्या वेगाने दिल्लीच्या बॅट्समननाही चकवा दिला आहे. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेला हर्ष मोठे सिक्सही मारू शकतो. याआधी 2020 सालच्या आयपीएलमध्ये (IPL 2020) हर्ष राजस्थान रॉयल्ससोबत (Rajasthan Royals) युएईलाही गेला होता. हर्षने त्याच्या बॉलिंगने दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना प्रभावित केलं आहे. तज्ज्ञांच्या मते हर्ष लवकरच स्वत:ची ओळख निर्माण करेल.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरूवात 9 एप्रिलपासून होणार आहे. यंदाचे सामने 6 ठिकाणी होणार आहेत, तसंच कोणतीही टीम घरच्या मैदानात एकही मॅच खेळणा नाही.
हर्ष विक्रम सिंगने जमुईतून बाहेर पडून दिल्लीत इंजिनियरिंगची डिग्री घेतली. तो युनिव्हर्सिटी टीमचा कर्णधारही होता. 2018 साली आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफी मॅचमध्ये बिहारकडून खेळताना हर्षने धमाकेदार सुरूवात केली. नागालँडविरुद्धच्या मॅचमध्ये बिहारची टीमने 80 रनवर 9 विकेट गमावल्या होत्या. 10 व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या हर्षने 48 रनची खेळी करून बिहारचा स्कोअर 150 रनपर्यंत पोहोचवला. बिहारचा या सामन्यात विजय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021