Home /News /sport /

IPL 2021 : कोरोनाच्या संकटात BCCI ने दिला परदेशी खेळाडूंना 'विश्वास'

IPL 2021 : कोरोनाच्या संकटात BCCI ने दिला परदेशी खेळाडूंना 'विश्वास'

भारतातल्या वाढत्या कोरोना (Corona Virus) संकटामुळे आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी आलेले खेळाडू चिंतेत आहेत. यातल्या काहींनी तर भीतीमुळे आयपीएल सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला. याबाबत आता बीसीसीआयने (BCCI) आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या परदेशी खेळाडूंना विश्वास दिला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 एप्रिल : भारतातल्या वाढत्या कोरोना (Corona Virus) संकटामुळे आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी आलेले खेळाडू चिंतेत आहेत. यातल्या काहींनी तर भीतीमुळे आयपीएल सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सचा लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आणि एन्ड्रयू टाय (Andrew Tye), तसंच बँगलोरचा (RCB) एडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांनी भारतातल्या वाढत्या कोरोना संकटामुळे मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. याबाबत आता बीसीसीआयने (BCCI) आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या परदेशी खेळाडूंना विश्वास दिला आहे. 'स्पर्धा संपल्यानंतर घरी कसं जायचं, याबाबत तुम्ही चिंतेत असाल, हे आम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला याची चिंता करण्याची गरज नाही. बीसीसीआय शक्य होईल तेवढं सगळं तुम्हाला तुमच्या घरपर्यंत पोहोचवण्यासाठी करेल. बीसीसीआय या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसंच स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंना घरी कसं पाठवायचं, याबाबत सरकारी अधिकाऱ्यांसोबत बोलत आहे. जोपर्यंत तुम्ही घरी जात नाही, तोपर्यंत बीसीसीआयसाठी आयपीएल स्पर्धा संपलेली नाही,' असं पत्र बीसीसीआयचे सीओओ हेमांग अमीन यांनी खेळाडूंना लिहिलं आहे. हेमांग अमिन यांनी आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या खेळाडूंचंही कौतुक केलं आहे. 'जर आम्ही थोडा वेळ तरी संकटात असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत असू तर आम्ही आमची भूमिका चोख बजावत आहोत, असं तुमच्यापैकी काही जण म्हणाले आहेत. जेव्हा तुम्ही मैदानात असता तेव्हा तुम्ही त्या लाखो लोकांमध्ये आशेचा किरण जागवत असता. तुमच्यामुळे जर एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, तर तुम्ही चांगलं काम केलं आहे. तुम्ही जिंकण्यासाठी खेळता, पण यावेळी मात्र तुम्ही त्यापेक्षा जास्त करत आहात,' अशी भावनिक प्रतिक्रिया अमिन यांनी या पत्रात दिली. भारतात प्रत्येक दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत, तसंच 2 हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. आयपीएल खेळण्यासाठी गेलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ऑस्ट्रेलियात परतण्याची त्यांची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australian PM Scott Morrison) यांनी हा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही खेळत आहेत, पण त्यांनी याबाबत अजून कोणतीही चिंता व्यक्त केली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Coronavirus, IPL 2021

    पुढील बातम्या