• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL 2021 : दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी

IPL 2021 : दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी

बीसीसीआयचं (BCCI) एण्टी करप्शन युनिट (ACU) युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल 2021 (IPL 2021) वर लक्ष ठेवून आहे. पंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा (Deepak Hooda) त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे एसीयूच्या रडारवर आला आहे.

  • Share this:
    दुबई, 22 सप्टेंबर : बीसीसीआयचं (BCCI) एण्टी करप्शन युनिट (ACU) युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल 2021 (IPL 2021) वर लक्ष ठेवून आहे. पंजाब किंग्सचा ऑलराऊंडर दीपक हुड्डा (Deepak Hooda) त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे एसीयूच्या रडारवर आला आहे. आयपीएलचा 32 वा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स (Punjab Kings vs Rajasthan Royals) यांच्यात मंगळवारी झाला. मॅच सुरू व्हायच्या काही तास आधी दीपक हुड्डाने सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला. Here We Go असं कॅप्शन दीपक हुड्डाने या फोटोला दिलं. या फोटोमध्ये दीपक हुड्डाने हेल्मेट घातलं आहे, पण याच फोटोमुळे तो अडचणीत सापडला आहे. बीसीसीआयचं एण्टी करप्शन युनिट हुड्डाच्या या पोस्टची चौकशी करणार आहे. त्याने भ्रष्टाचारसंबधी नियमांचं उल्लंघन केलं आहे का नाही, हे एसीयू पाहणार आहे. टीमची प्लेयिंग इलेव्हन किंवा टीमची संरचनेबाबत अशाप्रकारे माहिती देण्यावर बंदी आहे. या पोस्टमधून आपण प्लेयिंग इलेव्हनमध्ये असल्याचं प्रेरित होत आहे, त्यामुळे दीपक हुड्डाच्या या पोस्टची चौकशी होणार आहे. खेळाडूंनी काय करावं आणि काय करू नये? याबाबतचे नियम अगदी स्पष्ट आहेत, असं एसीयू अधिकाऱ्याने सांगितलं. मागच्यावर्षीही एसीयूचे माजी प्रमुख अजित सिंग यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या गोष्टींवर आमची टीम लक्ष ठेवून आहे, असं सांगितलं होतं. 'मॅचची ठिकाणं कमी आहेत आणि कोरोना व्हायरसमुळे शारिरिक हालचाल करण्यातही अडचणी आहेत. अशावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. एसीयूच्या नजरेतून काहीही सुटू नये, असा आमचा प्रयत्न आहे,' असं अजित सिंग म्हणाले होते. काही पीआर एजन्सी खेळाडूंचं सोशल मीडिया अकाऊंट सांभाळतात, त्यामुळे खेळाडूंनीही सावध राहिलं पाहिजे, कारण शेवटी हे खेळाडूंचं अकाऊंट आहे. खेळाडूंकडे असलेल्या पीआर एजन्सीला याबाबत माहिती पाहिजे. खेळाडूंनीही त्यांना काही संशयास्पद दिसलं, तर त्याची माहिती एसीयूला दिली पाहिजे. हा एक संयुक्त प्रयत्न असला पाहिजे, असं वक्तव्य अजित सिंग यांनी केलं होतं.
    Published by:Shreyas
    First published: