नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : आयपीएल 2021चे (IPL2021) उर्वरीत सामने आबु-धाबी येथे खेळवण्यात येत आहेत. क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या या लीगच्या कालावधीत खेळण्यात येणाऱ्या ड्रीम टीम (Dream11) स्पर्धेमध्ये एका नाभिकाला मालामाल (Barber wins jackpot in 'Dream11' contest) बनवले आहे.
बिहारमधील मधुबनी जिल्ह्यामधील छोटे केशकर्तनालय चालवणाऱ्या अशोक कुमारला ड्रीम टीम स्पर्धेमध्ये तब्बल एक कोटींचा जॅकपॉट लागला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये अशोकने ५0 रुपय खर्च करुन आपली ड्रीम ११ टीम निवडली होती. या सामन्यासाठी अशोकने निवडलेले दोन्ही संघांमधील सर्वच खेळाडू उत्तम खेळले आणि अशोकला जॅकपॉट लागला. रविवारी अशोकला विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
सामना संपल्यानंतर मी पहिल्या स्थानावर होतो आणि मला एक कोटींचं बक्षीस मिळालं. त्यानंतर मला ड्रीम 11 कडून फोन आला. त्यांमी मला पुढील दोन तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर कर वजा करुन 70 लाख रुपये जमा केले जातील असे सांगितले. मला त्या रात्री खरोखरच झोप लागली नाही,” असे अशोकने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
नीरज चोप्राची Brand Value विराट-धोनी एवढीच, तब्बल हजार टक्के वाढ!
तसेच, मी 50 रुपये प्रवेश शुल्क भरुन चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समधून माझा संघ निवडला होता. मी एवढा नशीबवान ठरेल असं मला वाटलं नव्हतो. सामना संपला तेव्हा मी निवडलेल्या संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने माझा थेट पहिला क्रमांक आला. खरं तर या खेळाडूंमुळेच मला एक कोटी रुपयांचं बक्षिस मिळाले असल्याचे अशोकने म्हटले आहे.
ड्रीम 11 ही एक ऑनलाइन स्पर्धा आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकाला सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघांमधील 22 खेळाडूंपैकी 11 खेळाडूंची निवड करुन आपला संघ बनावयचा असतो.
सेम टू सेम! विराट कोहली आणि शफाली वर्मा यांच्यातील फरक ओळखता येतो का? Photo
एखाद्या स्पर्धकाने निवडलेल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर त्यांना चांगले गुण मिळतात. याच गुणांच्या आधारे सामना संपल्यानंतर विजेता घोषित केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.