• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • DC Vs RCB: श्रीकर भारतचा अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार; बंगळुरूचा दिल्लीवर 7 गडी राखून विजय

DC Vs RCB: श्रीकर भारतचा अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार; बंगळुरूचा दिल्लीवर 7 गडी राखून विजय

आयपीएल २०२१ (IPL2021) स्पर्धेत बंगळुरूने(Royal Challengers Bangalore) दिल्लीवर(delhi capitals) ७ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने बंगळुरूला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरूने 7 गडी राखून पूर्ण केलं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: आयपीएल २०२१ (IPL2021) स्पर्धेत बंगळुरूने(Royal Challengers Bangalore) दिल्लीवर(delhi capitals) 7 गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने बंगळुरूला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरूने 7 गडी राखून पूर्ण केलं. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या आणि बेंगलोरला 165धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरने अखेरच्या चेंडूवर पूर्ण करत सामना जिंकला. बेंगलोरने 20 षटकांत 3 बाद 166धावा केल्या. बेंगलोरकडून165धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजीसाठी उतरले. पण सुरवात खराब झाली. एन्रीच नॉर्किएने दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पडीक्कल पहिल्या षटकात पहिल्याच बॉलवर आउट झाला. तर, विराट 4 रन करुन माघारी परतला. त्यानंतर श्रीकर भारतने एबी डिविलियर्ससह डाव सांभाळला. ही जोडी मैदानावर स्थिरावली असतानाच डिविलियर्स 26 रनांवर 10 व्या षटकात  झेल बाद झाला. पण त्यानंतर, ग्लेन मॅक्सवेलने भारतची दमदार साथ दिली. भारत आणि मॅक्सवेल या दोघांनी अर्धशतकं झळकावली. या दोघांनी शतकी भागादारी करत बेंगलोरला विजयाच्या दिशेने नेले. अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बेंगलोरला 6 धावांची गरज होती. पण हे षटक टाकत असलेल्या अवेश खानने वाईड चेंडू टाकला. त्यामुळे बेंगलोरसाठी विजयाचे समीकरण 1 चेंडू 5 धावा असे झाले. असे असतानाच श्रीकर भारतने खणखणीत षटकार ठोकला आणि बेंगलोरच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. श्रीकर भारत 52 चेंडूत 3 चौकार आणि 4  षटकारांसह 78 धावांवर नाबाद राहिला. तर मॅक्सवेलने 33 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 51 धावा केल्या. शिखर-शॉची दमदार सलामी
   बेंगलोर विरुद्ध दिल्ली सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली. या दोघांनीही दिल्लीला दमदार सुरुवात करुन दिली. पण, दोघांचेही अर्धशतकं थोडक्यात हुकली. या दोघांनी 88  रनांची सलामी दिली. त्यांची जोडी शिखर 43धावांवर 11 व्या षटकात हर्षल पटेल विरुद्ध खेळताना बाद झाल्याने तुटली.
  त्याच्यापाठोपाठ शॉ देखील 48 रनांवर12 व्या षटकात युजवेंद्र चहलच्या बॉलवर झेलबाद झाला. पुढच्या षटकात रिषभ पंतला डॅनियल ख्रिश्चनने10 रनांवर बाद केले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सांभाळला होता. पण श्रेयसला 18 रनांवर 18 व्या षटकात मोहम्मद सिराजने बाद केले. त्यापाठोपाठ डावाच्या अखेरच्या चेंडूवर शिमरॉन हेटमायर २९ धावांवर सिराजविरुद्ध खेळताना बाद झाला. त्यामुळे दिल्लीला 5 बाद 164धावा करता आल्या. रिपल पटेल 7 धावांवर नाबाद राहिला.
  Published by:Dhanshri Otari
  First published: