IPL 2021 : स्वत:च्या मायभूमीतच एण्ट्री नाही, ऑस्ट्रेलियन खेळाडू या देशात राहणार

IPL 2021 : स्वत:च्या मायभूमीतच एण्ट्री नाही, ऑस्ट्रेलियन खेळाडू या देशात राहणार

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) यंदाच्या वर्षाची आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) हा निर्णय घेतला आहे. पण आता ऑस्ट्रेलियन (Australia) खेळाडूंसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) यंदाच्या वर्षाची आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) हा निर्णय घेतला आहे. आयपीएल रद्द झाल्यानंतर आता घरी कसं जायचं, असा प्रश्न ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना (Australian Players) पडला आहे. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये जवळपास 40 ऑस्ट्रेलियन्स आहेत. यामध्ये पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, सायमन कॅटिच, रिकी पॉण्टिंग यांचा समावेश आहे. भारतातल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑस्ट्रेलियन सरकारने भारतासोबतची विमानसेवा बंद केली आहे, तसंच भारतातून येणाऱ्यांना ऑस्ट्रेलियात प्रवेश देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध कमीत कमी 15 मे पर्यंत लागू आहेत.

फास्ट बॉलर डॅनियल ख्रिश्चनने ब्रिटनमध्ये खेळण्यासाठी करार केला आहे, पण सध्या फक्त ब्रिटनच्याच नागरिकांना ब्रिटनमध्ये प्रवेश करायला परवानगी देण्यात आली आहे. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि अन्य सदस्य मालदीवला जाणार आहेत आणि तिकडे मायकल स्लेटरसोबत राहतील.

आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणारा मायकल स्लेटरने (Michael Slater) कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला परतण्याचा निर्णय घेतला. स्लेटर मालदीवमध्ये असतानाच ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले, त्यामुळे स्लेटर मालदीवमध्येच अडकला.

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) याने आम्हाला ऑस्ट्रेलियात प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 'जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियातून निघालो तेव्हा आम्हाला परतल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल, हे माहिती होतं, पण सीमा बंद केल्या जातील याबाबत कल्पनाही केली नव्हती. जशी योजना होती, तसेच घरी पोहोचू अशी आशा आहे. 15 मे रोजी सीमा उघडल्या जातील, अशी अपेक्षा करूया,' अशी प्रतिक्रिया कमिन्सने दिली.

दुसरीकडे क्रिकटे ऑस्ट्रेलियन आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन सरकारसोबत चर्चा करत आहे. यामुद्द्यावरून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेटर्स असोसिएशनच्या सदस्यांमध्ये बैठकही झाली. बीसीसीआयने आयपीएल स्थगित केल्याबाबात आम्हाला कल्पना आहे. खेळाडू, कोच, मॅच अधिकारी आणि कॉमेंटेटर यांना सुरक्षित घरी आणण्याबाबत बीसीसीआयसोबत आम्ही संपर्कात आहोत, असं अधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर सांगितलं. तसंच ऑस्ट्रेलियन सरकारने जो नियम बनवला आहे, त्यातून आम्ही सूट मागणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

न्यूझीलंडने (New Zealand) भारतातून येणाऱ्या विमान सेवेवरची बंदी उठवली आहे, पण दोन्ही देशांमध्ये विमानसेवा मर्यादित आहे. न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. याबाबत बोलताना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, आम्ही आयपीएलमध्ये खेळत असलेले खेळाडू, बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात आहोत, पण सध्या पर्यायांवर बोलणं योग्य नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमध्ये जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल होणार आहे. त्याआधी न्यूझीलंड आणि इंग्लंड दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत, त्यामुळे खेळाडूंना थेट इंग्लंडला पाठवायचं का न्यूझीलंडला परत बोलवायचं, याबाबत निर्णय झालेला नाही.

Published by: Shreyas
First published: May 4, 2021, 9:41 PM IST

ताज्या बातम्या