मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : भावा जिंकलंस! कोरोना संकटात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची PM Care Fund ला मोठी मदत

IPL 2021 : भावा जिंकलंस! कोरोना संकटात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची PM Care Fund ला मोठी मदत

कोरोनामुळे क्रिकेटपटू आयपीएल (IPL 2021) अर्ध्यातून सोडून जात आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मात्र भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे क्रिकेटपटू आयपीएल (IPL 2021) अर्ध्यातून सोडून जात आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मात्र भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे क्रिकेटपटू आयपीएल (IPL 2021) अर्ध्यातून सोडून जात आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मात्र भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 26 एप्रिल : भारतात वाढलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी आलेले अनेक परदेशी खेळाडू घरी परतत आहेत. राजस्थानच्या लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आणि एन्ड्रयू टाय (Andrew Tye) तसंच आरसीबीच्या एडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. तसंच कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यामुळे आर.अश्विन (R.Ashwin) यानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. कोरोनामुळे क्रिकेटपटू आयपीएल अर्ध्यातून सोडून जात असतानाच ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मात्र भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पॅट कमिन्स भारताला 50 हजार डॉलरची मदत करणार आहे. कमिन्सने याबाबतचं ट्वीट केलं आहे.

'भारतामध्ये मी गेली अनेक वर्ष येत आहे आणि इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं. एवढ्या जणांना त्रास होत असताना मलाही दु:ख होत आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असताना आयपीएल खेळवणं योग्य आहे का? असे प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत, पण लॉकडाऊनमध्ये असलेल्या असंख्य नागरिकांना या कठीण काळात थोडा तरी विरंगुळा मिळेल, या विचाराचं भारत सरकार असल्याचं मला सांगण्यात आलं.'

'आयपीएलमुळे आम्हाला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचता येतं, याचाच विचार करून मी पीएम केयर फंडाला आर्थिक मदत करायचं ठरवलं आहे. यामुळे भारताला गरज असलेले ऑक्सिजन सिलेंडर विकत घेता येतील. याचसोबत मी माझे सहकारी खेळाडू आणि इतरांनाही विनंती करतो की ज्यांना भारताकडून प्रेम मिळालं आहे, त्यांनीही मदत करावी. मी 50 हजार डॉलरची मदत करत आहे.'

'अशा कठीण परिस्थितीमध्ये अनेकांना असहाय्य वाटू शकतं. मलाही नजिकच्या काळात असं वाटलं. पण हे आवाहन केल्यामुळे आपण आपल्या भावना कार्यात उतरवू शकतो आणि अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पाडू शकतो. माझी मदत ही फार मोठी नाही, पण यामुळे कोणाच्यातरी आयुष्यात नक्कीच फरक पडेल,' असं पॅट कमिन्स म्हणाला आहे.

पॅट कमिन्स हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. आयपीएल इतिहासातला कमिन्स हा दुसरा सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू आहे. 2020 सालच्या आयपीएल लिलावात पॅट कमिन्सला केकेआरने 15.50 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या 50 हजार डॉलरच्या हिशोबाने पॅट कमिन्सने दिलेली मदत जवळपास 29 लाख रुपये होते.

First published:

Tags: Coronavirus, IPL 2021, KKR