मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021: टेम्पोचालकाच्या मुलावर लागली 1कोटी 20 लाखांची बोली; आता कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार

IPL Auction 2021: टेम्पोचालकाच्या मुलावर लागली 1कोटी 20 लाखांची बोली; आता कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार

चेतन साकरिया (Chetan sakaria) या वेगवान गोलंदाजासाठी RCB अर्थात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने गुरुवारच्या लिलावात 1 कोटी 20 लाखांची बोली लावली.

चेतन साकरिया (Chetan sakaria) या वेगवान गोलंदाजासाठी RCB अर्थात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने गुरुवारच्या लिलावात 1 कोटी 20 लाखांची बोली लावली.

चेतन साकरिया (Chetan sakaria) या वेगवान गोलंदाजासाठी RCB अर्थात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने गुरुवारच्या लिलावात 1 कोटी 20 लाखांची बोली लावली.

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: जिद्द, मेहनत आणि त्यासोबत योग्य वेळ आणि संधी मिळाली तर एखाद्याचं आयुष्य कसं पालटू शकतं हे या उदाहरणावरून समजेल. (IPL 2021 Auction) आयपीएल लिलावात फारशी चर्चा झालेली नसली, तरी चेतन साकरिया नावाच्या युवा खेळाडूचा प्रवास थक्क करणारा आहे.

चेतन साकरिया (Chetan sakaria) या वेगवान गोलंदाजाला RCB अर्थात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने गुरुवारच्या लिलावात विकत घेतलं. आता तो IPL 2021 मधून चमकदार कामगिरी करण्यासाठी विराट कोहलीच्या संघात दाखल झाला आहे. या चेतनचे वडील टेम्पोचालत. घरची परिस्थितीत अगदीच बेताची, इतकी की त्यामुळे चेतनला शिक्षणसुद्धा अर्धवट सोडावं लागलं. पण अशा परिस्थितीतून गाव, जिल्हा पातळीवर खेळत तो राज्य पातळीपर्यंत पोहोचला. रणजी संघात स्थान मिळवलं आणि गेल्या वर्षी मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये संधी मिळाली. तिथे त्याने अशी कामगिरी केली की, IPL संघनिवड करणाऱ्यांच्या डोळ्यात तो भरला. चेन्नई झालेल्या आयपीएल लिलावात त्याच्यावर तब्बल एक कोटी 20 लाखांची बोली लावण्यात आली.

चेतन साकरियाचा जन्म भावनगर जिल्ह्यातल्या वरतेज नावाच्या छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच तो खेळात तरबेज होता. अगदी लहान असताना मित्रांबरोबर क्रिकेट खेळतानाही तो लांबवरून धावत येऊन वेगवान बॉल टाकत असे.

घरची परिस्थिती अशी होती की, त्याच्यातल्या या टॅलेंटकडे लक्ष द्यायलाही फार अवधी नव्हता. घरात वडील एकटे कमावते आणि तेही टेम्पो ड्रायव्हर. कधी काम मिळायचं तर कधी नाही. घरात मोजकाच पैसा, त्यामुळे अॅकॅडमीत जाऊन क्रिकेट ट्रेनिंग वगैरे अवघडच होतं. पण चेतनने मेहनत सोडली नाही. त्याचं क्रिकेटवरचं प्रेम कमी झालं नाही. शाळास्तरावर खेळत तो जिल्हा पातळीपर्यंत पोहोचला. गावागावातल्या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये तो सामील होऊ लागला. आधी डिस्ट्रिक्ट लेव्हलला आणि तिथून राज्य पातळीवर सिलेक्टही झाला.

हेही वाचा - सचिनच्या अर्जुनचं IPLमध्ये पदार्पण! ‘या’ टीमकडून खेळणार T20

गुजरातच्या रणजी संघात चेतनची निवड झाली आणि त्याचं नशीब फळफळलं. त्यातूनच गेल्या वर्षी त्याची मुस्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली. यात त्याने कमाल केली. अवघ्या 4.9 च्या रनरेटने 13 विकेट्स मिळवल्या आणि सिलेक्टर्सच्या तो नजरेत आला.

22 वर्षांच्या चेतनने मग मागे वळून पाहिलं नाही. MRF अॅकॅडमीमध्ये जगप्रसिद्ध गोलंदाज मॅग्राथचं त्याला मार्गदर्शन मिळालं आणि त्याची गोलंदाजी आणखी सुधारली, वेग वाढला. मागच्या IPL हंगामात त्याला प्रत्यक्ष खेळायची संधी मिळाली नसली तरी नेट बॉलर म्हणून तो बंगळुरूच्या (RCB)संघाबरोबर होता. कुणी बोलर जखमी झाला तर त्याला संधी मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. तेव्हा संधी नाही मिळाली, पण या वेळी मात्र IPL Auction 2021 मध्ये त्याला RCB च्या संघात थेट स्थान मिळालं आहे.

First published:
top videos

    Tags: Gujrat, IPL 2021, Ipl 2021 auction, RCB