मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPLAuction उद्या चेन्नईत होणार लिलाव; पाहा कोणत्या टीमकडे किती जागा, रक्कम शिल्लक

IPLAuction उद्या चेन्नईत होणार लिलाव; पाहा कोणत्या टीमकडे किती जागा, रक्कम शिल्लक

आयपीएल 2021 साठी उद्या चेन्नईमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावात जवळपास 292 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

आयपीएल 2021 साठी उद्या चेन्नईमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावात जवळपास 292 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

आयपीएल 2021 साठी उद्या चेन्नईमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावात जवळपास 292 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

चेन्नई, 17 फेब्रुवारी : आयपीएल 2021 (Ipl 2021) साठी उद्या चेन्नईमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावात जवळपास 292 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने (IGC) उद्या दुपारी 3 वाजता हा लिलाव होणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. अनेक टीमने आपले अनेक खेळाडू रिलीज केले असून या लिलावात (Auction) सर्वच टीम खेळाडूंची खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. एकूण 292 खेळाडूंमध्ये 164 भारतीय आणि 125 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यावर्षी आयपीएलचं चौदावं सत्र एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याची अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आलेली नसून सर्व टीममध्ये मिळून 61 खेळाडूंच्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे उद्या कोणत्या खेळाडूंना संधी मिळते याकडे खेळाडूंबरोबरच सर्वांचं लक्ष लागलं आहे. या लिलावात पंजाबच्या संघाकडे सर्वात जास्त रक्कम शिल्लक असून त्यांच्याकडे एकूण 53 कोटी रुपये शिल्लक आहेत. विराट कोहलीच्या आरसीबीकडे 11 खेळाडूंची जागा असून हैदराबादकडे जवळपास 11 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. चेन्नईकडे जवळपास 20 कोटी रुपये शिल्लक असून सात जागा त्यांच्याकडे रिक्त आहेत. जाणून घ्या कोणत्या टीमकडे किती रक्कम आणि जागा शिल्लक आहे.

(वाचा - IND vs ENG: हार्दिक पांड्याचा मैदानात 'शर्टलेस' सराव, पाहा PHOTOS)

1)चेन्नई सुपर किंग्स  (CSK) खेळाडूंची संख्या : 19 विदेशी खेळाडूंची संख्या : 07 शिल्लक जागा  : 06 विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 01 शिल्लक रक्कम: 19.90 कोटी रुपये 2)दिल्ली कॅपिटल्स  (DC) खेळाडूंची संख्या : 17 विदेशी खेळाडूंची संख्या : 05 शिल्लक जागा  : 03 विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 01 शिल्लक रक्कम: 13.04 कोटी रुपये

(वाचा - IPL लिलावाआधी मोठी बातमी; स्टार खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती)

3)पंजाब किंग्स (Punjab Kings) खेळाडूंची संख्या : 16 विदेशी खेळाडूंची संख्या : 03 शिल्लक जागा  : 09 विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 05 शिल्लक रक्कम: 53.20 कोटी रुपये 4)कोलकाता नाईट रायडर्स  (KKR) खेळाडूंची संख्या : 17 विदेशी खेळाडूंची संख्या : 06 शिल्लक जागा  : 08 विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 02 शिल्लक रक्कम: 10.75 कोटी रुपये 5)मुंबई इंडियन्स  (MI) खेळाडूंची संख्या : 18 विदेशी खेळाडूंची संख्या : 04 शिल्लक जागा : 07 विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 04 शिल्लक रक्कम : 15.35कोटी रुपये 6) राजस्थान रॉयल्स  (RR) खेळाडूंची संख्या : 16 विदेशी खेळाडूंची संख्या : 05 शिल्लक जागा  : 09 विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 03 शिल्लक रक्कम : 15.35 कोटी रुपये

(वाचा - IPL च्या इतिहासातील वादग्रस्त खेळाडू, खावी लागली आहे जेलची हवा)

7) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  (RCB) खेळाडूंची संख्या : 14 विदेशी खेळाडूंची संख्या : 05 शिल्लक जागा  : 14 विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 03 शिल्लक रक्कम: 35.40 कोटी रुपये 8)सनरायजर्स हैदराबाद  (SRH) खेळाडूंची संख्या : 22 विदेशी खेळाडूंची संख्या : 07 शिल्लक जागा  : 03 विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 01 शिल्लक रक्कम: 10.75 कोटी रुपये
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Chennai, India, IPL 2021

पुढील बातम्या