मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सनरायझर्स हैदराबादचा पराभव; मैदानात मात्र 'त्या' मिस्ट्री गर्लची गुलाबी हवा

सनरायझर्स हैदराबादचा पराभव; मैदानात मात्र 'त्या' मिस्ट्री गर्लची गुलाबी हवा

SRH संघाचा पराभव पण मैदानात 'त्या' मिस्ट्री गर्लची गुलाबी हवा

SRH संघाचा पराभव पण मैदानात 'त्या' मिस्ट्री गर्लची गुलाबी हवा

कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) रविवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. दरम्यान क्रिकेट वर्तुळात सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाच्या पराभवासोबत एक खास चर्चा रंगली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 04 ऑक्टोबर: कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) रविवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. दरम्यान क्रिकेट वर्तुळात सनरायझर्स हैदराबाद  ( SRH) संघाच्या पराभवासोबत एक खास चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मैदानात गुलाबी हवा करणाऱ्या मिस्ट्री गर्लची(mystery girl). गुलाबी हवा करणारी मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न अनेक क्रिकेटवेड्यांना पडला आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या आणखी एका पराभवानंतर सर्वांच्या नजरा हैदराबादच्या VIP गेस्ट बॉक्समध्ये पोहचल्या. पण प्रेक्षकवर्गाला गेस्ट बॉक्समध्ये उभी असलेली गुलाबी टॉपची मिस्ट्री गर्ल दिसली अन् पराभवामध्ये हरवलेल्या प्रेक्षकांच्या नजरा गुलाबी टॉप अन् जिन्स घातलेल्या सुंदरीवरच खिळल्या.

मनीष पांडे की पत्नी आश्रिता शेट्टी

गुलाबी टॉप अन् जिन्स घातलेली ती तरुणी हैदराबादला चिअर करत होती. तिच्या स्माईली लूकनं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला अन् ती नेमकी आहे तरी कोण याचा शोध सुरू झाला. तर ती दुसरी तिसरी कोण नसुन हैदराबादचा व भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे याची पत्नी आहे.

ती सामान्य तरुणी नाहीतर दाक्षिणात्य अभिनेत्री आहे आणि अश्रिता शेट्टी ( Ashrita Shetty ) असे तिचे नाव आहे.

मनीष पांडेची विकेट घेणारी ‘ही’ अभिनेत्री कोण आहे?

मनीष पांडे व अश्रिता शेट्टी यांनी मुंबईत 2 डिसेंबर 2019 मध्ये विवाह केला. 30 वर्षीय मनीषने दाक्षिणात्य अभिनेत्रीशी विवाह केला. मागील काही कालावधीपासून अश्रिता आणि मनीष हे रिलेशनशिपमध्ये होते.

Image

आश्रिता शेट्टीचा जन्म 16 जुलै 1993 रोजी झाला आहे. 2010 मध्ये ब्युटी कॉन्टेस्ट ‘क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस’मध्ये जिंकल्यानंतर तिने एका कॉमेडी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव तेलिकेडा बोली आहे.

यानंतर आश्रिता शेट्टीला एनएच 4 मध्ये अभिनेता सिद्धार्थसोबत काम केले. एनएच 4 एक तमिळ रोमांटिक थ्रिलर चित्रपट होता. जो 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिमारन यांनी केले होते. चित्रपटात येण्यापूर्वी आश्रिताने अनेक जाहिरातीतही काम केले आहे.

ही जोडी क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील नवीन जोडी आहे. याआधी अभिनेत्री अनुष्का शर्मा- क्रिकेटर विराट कोहली, क्रिकेटर युवराज सिंह- अभिनेत्री हेजल केच, क्रिकेटर जहीर खान- अभिनेत्री सागरिका घाटगे, क्रिकेटर हरभजन सिंह- अभिनेत्री गीता बसरा, क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन- अभिनेत्री संगीता बिजलानी यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केलं आहे.

First published:

Tags: IPL 2021, SRH