Home /News /sport /

IPL 2021 : आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरवर लागणार मोठी बोली!

IPL 2021 : आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरवर लागणार मोठी बोली!

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या मुलाने सय्यद मुश्ताक अली (Sayed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेतून सिनियर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हरियाणाविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ची मुंबईच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये निवड झाली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 जानेवारी : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या मुलाने सय्यद मुश्ताक अली (Sayed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेतून सिनियर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हरियाणाविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ची मुंबईच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये निवड झाली. अर्जुनने 2018 साली भारताच्या अंडर-19 टीमसाठी पदार्पण केलं होतं, पण सीनियर टीममध्ये येण्यासाठी त्याला दोन वर्षांची वाट पाहावी लागली. या काळात अर्जुन इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेटही खेळला. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनला चकमदार कामगिरी करता आली नाही. या मॅचमध्ये त्याला फक्त एक विकेट मिळाली. पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करत असताना अर्जुनने चैतन्य बिष्णोईला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. अर्जुनच्या बॉलिंगवर विकेट कीपर आदित्य तरेने चैतन्य बिष्णोईचा कॅच पकडला. या मॅचमध्ये अर्जुन मुंबईचा सगळ्यात महागडा बॉलर ठरला. अर्जुनने 3 ओव्हरमध्ये 34 रन दिले. पहिल्याच सामन्यात म्हणावी तशी कामगिरी करता आली नसली, तरी अर्जुनसाठी खुशखबर आहे. मुंबईकडून पदार्पण केल्यामुळे आयपीएलच्या लिलावासाठी अर्जुन क्वालिफाय झाला आहे. त्यामुळे आयपीएलच्या 2021 साठीच्या लिलावामध्ये त्याच्यावर एखादी फ्रॅन्चायजी मोठी बोली लावेल, अशी शक्यता आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीएलचा लिलाव होणार आहे. मुंबईचा तिसरा पराभव मुंबईचा हरियाणाविरुद्धच्या या मॅचमध्ये 8 विकेटने पराभव झाला आहे, त्यामुळे मुंबईची टीमचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबईच्या आणखी दोन मॅच बाकी आहेत, पण लागोपाठ तीन मॅच हरल्यामुळे त्यांना नॉकआऊटमध्ये प्रवेश मिळणार नाही. स्पर्धेच्या नियमानुसार सगळ्या 6 ग्रुपच्या टॉप-2 टीम नॉकआऊटमध्ये प्रवेश करतील. मुंबईने उरलेल्या सगळ्या मॅच जिंकल्या तरी त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स होतील, हे पॉईंट्स नॉकआऊटमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरे पडणार नाहीत. मुंबईविरुद्धच्या सामन्यात हरियाणाचा अनुभवी स्पिनर जयंत यादवने 22 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर फास्ट बॉलर अरूण चपराणाने 22 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. यामुळे मुंबईची टीम 143 रनवर आऊट झाली. हरियाणाच्या हिमांशू राणाने 53 बॉलमध्ये नाबाद 75 रन केले आणि शिवम चौहानने 43 रनची नाबाद खेळी केली. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 117 रनची नाबाद पार्टनरशीप झाली, ज्यामुळे हरियाणाने हा सामना 14 बॉल बाकी असतानाच 8 विकेटने जिंकला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या