मुंबई, 30 मार्च : सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आयपीएलच्या या मोसमातून पदार्पण करू शकतो. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अर्जुनला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. सचिन खेळत असताना मुंबईने आयपीएल स्पर्धा जिंकली, एवढंच नाही तर त्याने या स्पर्धेत शतकही लगावलं. मुंबई इंडियन्सने मंगळवारी खेळाडूंचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला. मुंबई इंडियन्सचे खेळाडू या फोटोमध्ये सराव करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये अर्जुन तेंडुलकर खेळपट्टी बघत आहे. याशिवाय या फोटोमध्ये टीमचा क्रिकेट ऑपरेशन्स डायरेक्टर झहीर खान, ऑफ स्पिनर जयंत यादवही दिसत आहेत.
आयपीएलच्या या मोसमाची सुरूवात 9 एप्रिलपासून होणार आहे. मोसमातला पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा टीमसोबत आला आहे, तर बँगलोरचा कर्णधार विराट कोहली 1 एप्रिलला आरसीबीच्या बायो-बबलमध्ये जाईल.
आयपीएल लिलावात बोली लागण्याआधीही अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत सराव करताना दिसला होता. झहीर खान यानेही अर्जुन तेंडुलकरचं कौतुक केलं होतं. 'अर्जुन तेंडुलकर खूप मेहनती आहे. सचिनचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कायमच दबाव असणार आहे. याचसोबत त्याला जगावं लागणार आहे. टीमच्या वातावरणा त्याला नक्कीच मदत मिळेल,' असं झहीर म्हणाला होता.
मुंबईची टीम
रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरान पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंदुलकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun Tendulkar, Cricket news, IPL 2021, Mumbai Indians, Sachin tendulkar, Sports