मुंबई, 26 मार्च : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे, तर फायनल 30 मे रोजी खेळवण्यात येईल. यावेळी आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर या दोन्ही टीममध्ये पहिला सामना होईल. कोरोना व्हायरसमुळे यावर्षी आयपीएल 6 शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. यात अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश आहे. तसंच कोणत्याही टीमला त्यांच्या घरच्या मैदानात एकही सामना खेळता येणार नाही.
आयपीएल सुरू व्हायच्या आधी मुंबई इंडियन्सचे खेळाडू नेटमध्ये सराव करण्यासाठी उतरले. यावेळी अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यानेही मैदानात सराव केला. अर्जुनने नेटमध्ये ऑस्ट्रेलियेचा ओपनर क्रिस लिन (Chris Lynn) याला बॉलिंग केली. अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सनी लिलावात 20 लाख रुपयांना विकत घेतलं.
पियुष चावला (Piyush Chawala) आणि सौरभ तिवारी (Saurabh Tiwari) यांनी मुंबईच्या ट्रेनिंग कॅम्पबाबत प्रतिक्रिया दिली. 'क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर अखेरमैदानात पाऊल ठेवताना नेहमीच चांगलं वाटतं, असं पियुष चावला म्हणाला. मुंबईने पियुष चावलावर 2.4 कोटी रुपयांची बोली लावली होती. सौरभ तिवारीनेही नेटमध्ये बॅटिंगचा सराव केला. आताच अबू धाबीवरून परत आल्यासारखं वाटत आहे. आमचे काही खेळाडू अजून पोहोचले नसले, तरी सध्या असलेले खेळाडू फिट आणि खेळण्यासाठी सज्ज दिसत असल्याचं सौरभ तिवारी या व्हिडिओमध्ये म्हणाला.
Our boys are back in MI colours! 💪😎
Paltan, it’s time for Net - Set - Go ⚡#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 pic.twitter.com/6jZ9cXy89a — Mumbai Indians (@mipaltan) March 26, 2021
मुंबई इंडियन्सच्या टीमचे आधारस्तंभ असलेले रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या हे खेळाडू सध्या इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज खेळत आहेत. ही सीरिज संपल्यानंतर हे सगळे खेळाडू बायो-बबलमध्ये येतील. टीम इंडियाचे आणि इंग्लंडचे खेळाडू सध्या बायो-बबलमध्येच आहेत. बीसीसीआयच्या नियमांनुसार खेळाडू एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये जाऊ शकतात, यासाठी त्यांना क्वारंटाईन व्हायची गरज नाही.
इशान किशन, नॅथन कुल्टर नाईल, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर या खेळाडूंसह मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी बायो-बबलमध्ये प्रवेश केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun Tendulkar, Cricket news, IPL 2021, Mumbai Indians