• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : कॅप्टन्सी सोडल्यावर विराटला एबीने दिलं खास गिफ्ट, दोघं झाले इमोशनल, VIDEO

IPL 2021 : कॅप्टन्सी सोडल्यावर विराटला एबीने दिलं खास गिफ्ट, दोघं झाले इमोशनल, VIDEO

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) बँगलोरची अवस्था निराशाजनक झाली आहे. लीगच्या 31 व्या मॅचमध्ये आरसीबीचा कोलकात्याने (RCB vs KKR) 9 विकेटने पराभव केला.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये (IPL 2021)  विराट कोहलीच्या (Virat Kohli) बँगलोरची अवस्था निराशाजनक झाली आहे. लीगच्या 31 व्या मॅचमध्ये आरसीबीचा कोलकात्याने (RCB vs KKR) 9 विकेटने पराभव केला. पहिले बॅटिंग करताना आरसीबीला फक्त 92 रन करता आले. विराट आणि एबी डिव्हिलियर्ससारखे (Ab De Villiers) मोठे खेळाडूही अपयशी ठरले. पहिले बॅटिंग करणाऱ्या आरसीबीला फक्त 92 रनच करता आले. या आव्हानाचा पाठलाग केकेआरने 60 बॉल आधीच केला. विराट कोहलीसाठी हा सामना खूप खास होता, पण तरीही त्याच्या पदरी निराशा आली. विराट कोहलीचा आरसीबीकडून हा 200 वा सामना होता. हा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. विराटआधीही बरेच खेळाडू 200 आयपीएल मॅच खेळले आहेत, पण एका टीमकडून एवढ्या मॅच खेळणारा विराट हा पहिलाच खेळाडू ठरला.
  एबी डिव्हिलियर्सने विराटला त्याच्या 200 व्या सामन्यानिमित्त 200 नंबरची जर्सी भेट दिली. या जर्सीवर विराट कोहलीचं नाव लिहिलं होतं. विराट 2008 पासून आरसीबीसोबत आहे. विराट कोहलीचं कर्णधार म्हणून हा 133 वा सामना होता. या मोसमानंतर विराटने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे कोलकात्याचीही ही 200 वी मॅच होती. टीमने 100 मॅच जिंकल्या तर 95 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 211 मॅच खेळल्या, तर आरसीबीची ही 204 वी मॅच होती. टीमन 94 मॅच जिंकल्या आणि 102 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला.
  Published by:Shreyas
  First published: