Home /News /sport /

IPL 2021 : आकाश चोप्रा Live Show मध्ये धवनला म्हणाला 'बदतमीज', पाहा कारण

IPL 2021 : आकाश चोप्रा Live Show मध्ये धवनला म्हणाला 'बदतमीज', पाहा कारण

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएल 2021 (IPL 2021) ची सुरुवात धमाकेदार विजयासह केली. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्या शतकी पार्टनरशीपमुळे दिल्लीने चेन्नईचं (CSK) 189 रनचं आव्हान अगदी सहज पूर्ण केलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 एप्रिल : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएल 2021 (IPL 2021) ची सुरुवात धमाकेदार विजयासह केली. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्या शतकी पार्टनरशीपमुळे दिल्लीने चेन्नईचं (CSK) 189 रनचं आव्हान अगदी सहज पूर्ण केलं. धवन आणि शॉ यांच्यात 138 रनची पार्टनरशीप झाली. शिखर धवनने या सामन्यात 54 बॉलमध्ये 85 रनची खेळी केली, यात 10 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. या कामगिरीबद्दल धवनला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. चेन्नईविरुद्धच्या या मॅचमध्ये शिखर धवनने अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले. चेन्नईविरुद्ध आता धवनने 910 रन केले आहेत. विराट कोहलीचं 901 रनचं रेकॉर्ड धवनने मोडलं. याशिवाय आयपीएल इतिहासात 600 फोर मारणारा धवन पहिलाच खेळाडू आहे. शिखर धवनने या सामन्यात चेन्नईच्या फास्ट बॉलरनाही स्वीप शॉट मारला. धवनची ही बॅटिंग बघून कॉमेंटेटर आकाश चोप्राही (Aakash Chopra) हैराण झाला. मॅच संपल्यानंतर लाईव्ह शोमध्ये आकाश चोप्रा मस्करीत म्हणाला, 'इतनी बदतमीजी से कौन खेलता है?' 6 वर्षानंतर पहिल्यांदाच दिल्लीच्या दोन्ही ओपनरनी एकाच सामन्यात अर्धशतकं केली. याआधी 2015 साली किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मयंक अग्रवाल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकं केली होती. धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात झालेली 138 रनची पार्टनरशीप चेन्नईविरुद्धची दुसरी सगळ्यात मोठी ओपनिंग पार्टनरशीप होती. चेन्नईविरुद्ध सगळ्यात मोठ्या ओपनिंग पार्टनरशीपचा रेकॉर्ड अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसनच्या नावावर आहे. 2015 साली या दोघांनी 144 रनची पार्टनरशीप केली होती. शिखर धवनने त्याच्या या खेळीमध्ये डेव्हिड वॉर्नरलाही मागे टाकलं आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये धवन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. धवनने 177 सामन्यांमध्ये 5,282 रन केले आहेत. या यादीत विराट कोहली 5,911 रनसह पहिल्या क्रमांकावर तर सुरेश रैना 5,422 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, Shikhar dhawan

    पुढील बातम्या