IPL 2021 : विराट कोहलीला त्रास देणारा बॉलर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

IPL 2021 : विराट कोहलीला त्रास देणारा बॉलर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

यंदाच्या वर्षाच्या आयपीएलला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे, त्याआधी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या ताफ्यात नव्या फास्ट बॉलर आणला आहे. या बॉलरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) चांगलाच त्रास दिला होता. 17 वर्षांच्या त्या बॉलरचं नाव होतं मार्को जेनसन (Marco Jansen).

  • Share this:

मुंबई, 24 मार्च : यंदाच्या वर्षाच्या आयपीएलला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे, त्याआधी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या ताफ्यात नव्या फास्ट बॉलर आणला आहे. या बॉलरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) चांगलाच त्रास दिला होता. 2018 च्या सुरुवातीला विराट जोहान्सबर्ग टेस्टच्या आधी वॉंडरर्स स्टेडियमच्या नेटमध्ये बॅटिंग प्रॅक्टिस करत होता. सीरिजच्या एका इनिंगमध्ये त्याने 153 रनची खेळी केली होती, पण सरावामध्ये विराट तीन वेळा ऑफसाईडला बीट झाला. विराटला चकवा देणारा हा फास्ट बॉलर भारतीय नव्हता. 17 वर्षांच्या त्या बॉलरचं नाव होतं मार्को जेनसन (Marco Jansen). योगायोगाने मार्कोचा भाऊ डुआनही त्यावेळी मैदानात होता. या दोन्ही भावांनी विराटसोबत फोटो काढले. मार्को आणि डुआन डावखुरे फास्ट बॉलर आहेत.

6 फूट 8 इंच उंची असलेल्या मार्कोला मुंबई इंडियन्सनी 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. लिलावामध्ये मार्कोवर मोठी बोली लागेल, असं मला वाटल्याचं मुंबई इंडियन्सचा क्रिकेट ऑपरेशन्स डायरेक्टर झहीर खान (Zaheer Khan) म्हणाला. तसंच मागच्या दोन वर्षांपासून आम्ही मार्कोला ट्रॅक करत असल्याचं मुंबई इंडियन्सने मालक आकाश अंबानी (Aakash Ambani) यांनी सांगितलं.

मार्को जॉनसन सरासरी 137-138 किमी वेगाने बॉलिंग करतो. तसंच त्याचा सर्वाधिक वेग 141.2, 141.3 किमी एवढा आहे. जेनसनचे वडील कूस रग्बी खेळाडू होते. मार्को त्याचा जुळा भाऊ डुआनपेक्षा 15 मिनिटांनी मोठा आहे. आयपीएलच्या टीममध्ये निवड झाल्यानंतर डुआन खूश झाला, आम्ही एकमेकांना पाठिंबा देतो, आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही, अशी प्रतिक्रिया मार्कोने दिली.

राहुल द्रविडही झाला होता प्रभावित

2018 सालच्या नेट प्रॅक्टिसआधीही मार्कोने भारतीय बॅट्समनना त्रास दिला होता. 2017 साली इंडिया ए च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर या दोन्ही भावांनी मनिष पांडे, करुण नायर आणि अभिनव मुकुंद, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बॉलिंग केली होती. जेनसन बंधूंची जोडी जेव्हा भारतीय बॅट्समनना बॉलिंग करत होती, तेव्हा राहुल द्रविड (Rahul Dravid) उभा राहून या दोघांची बॉलिंग बघत होता. त्यावेळी द्रविड इंडिया ए चा प्रशिक्षक होता.

आयपीएलसाठी मार्को जेनसन पहिल्यांदाच भारतात येणार नाही. याआधी 2019 साली दक्षिण आफ्रिका ए दौऱ्यासाठी तो भारतात आला होता. जेनसनने 2018 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये जेनसनने 440 रन केले तसंच 54 विकेटही घेतल्या. तर लिस्ट ए मॅचमध्ये त्याने 112 रन केले आणि 16 विकेट घेतल्या. मार्कोने 10 टी-20 सामन्यांमध्ये 71 रन केल्या आणि 6 विकेट मिळवल्या. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर मार्कोसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडू शकतात.

Published by: Shreyas
First published: March 24, 2021, 8:03 PM IST

ताज्या बातम्या