Home /News /sport /

IPL 2021: आयपीएलचे 10 नवे rules, खेळाडूंसह कुटुंबालाही पाळावे लागणार

IPL 2021: आयपीएलचे 10 नवे rules, खेळाडूंसह कुटुंबालाही पाळावे लागणार

आयपीएलच्या 14व्या मोसमाची (IPL 2021) सुरूवात 9 एप्रिलपासून होणार आहे. यंदाच्या वर्षी पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे.

    मुंबई, 25 मार्च : आयपीएलच्या 14व्या मोसमाची (IPL 2021) सुरूवात 9 एप्रिलपासून होणार आहे. यंदाच्या वर्षी पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे यावेळी आयपीएलच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यंदा ही स्पर्धी 6 शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. यात अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश आहे. तसंच कोणत्याही टीमला त्यांच्या घरच्या मैदानात एकही सामना खेळता येणार नाही. लागोपाठ दुसऱ्या वर्षी प्रेक्षकांशिवाय आयपीएलचे सामने खेळवले जातील. मागच्यावर्षी कोरोनामुळे आयपीएल युएईमध्ये खेळवली गेली होती. आयपीएलचे 10 नियम कुटुंब आणि मालक बायो-बबलमध्ये खेळाडू आणि त्यांचं कुटुंब तसंच टीमचे मालक यांना बायो-बबलमध्ये राहावं लागणार आहे, तसंच अत्यावश्यक गरज असेल तरच त्यांना बायो-बबलमधून बाहेर येता येईल. यासाठी बीसीसीआयच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची औपचारिक परवानगी घ्यावी लागेल. हॉटेलमध्ये टीम एरिया सील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी टीमनी संपूर्ण हॉटेल बूक करावं, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. पण जर हे शक्य झालं नाही, तर हॉटेलची एक विंग टीमसाठी आरक्षित असेल. जे टीमचा भाग नाहीत, त्यांना या विंगमध्ये येता येणार नाही. ज्यामुळे खेळाडू दुसऱ्यांचा संपर्कात येणार नाहीत. बबल इंटिग्रिटी मॅनेजरची नजर बायो-बबलच्या नियमांचं पालन करण्यासाठी प्रत्येक टीमसाठी बबल इंटिग्रिटी मॅनेजरच्या चार सदस्यांची टीम बनवली जाईल. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ कडक नियमांचं पालन करत आहेत का नाही, यावर हे इंटिग्रिटी मॅनेजर लक्ष ठेवतील. जर कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं, तर याबाबत इंटिग्रिटी मॅनेजर अधिकाऱ्यांना माहिती देतील. खेळाडूंना करावा लागणार खर्च जे खेळाडू इंग्लंड, युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि मध्य पूर्व देशांमधून येणार आहेत, त्यांना 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. या क्वारंटाईन कालावधीचा खर्च खेळाडूंना स्वत: करावा लागणार आहे. बॉल लगेच बदलला जाणार क्रिकेट मॅचमध्ये वापरण्यात येणारा बॉल कोरोना वाहक नाही, पण तरीही धोका टाळण्यासाठी तर एखादा बॉल स्टेडियममध्ये किंवा मैदानाबाहेर गेला तर तो लगेच बदलला जाईल. पण बॉलला सॅनिटाईज करून पुन्हा त्याचा वापर केला जाऊ शकतो. बबल टू बबलची सुविधा खेळाडूंच्या क्वारंटाईनचा ताण कमी करण्यासाठी बीसीसीआयने बबल टू बबलची सुविधा दिली आहे, त्यामुळे भारत-इंग्लंड सीरिजमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना पुन्हा क्वारंटाईन व्हायची गरज नाही. हे खेळाडू एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये जातील. चेन्नईमध्ये विशेष पास चेन्नईला पोहोचणाऱ्या खेळाडूंना विशेष ई-पास घ्यावा लागणार आहे. हा पास तामीळनाडू सरकारकडून देण्यात येणार आहे. या राज्यात असलेल्या नियमांमुळे हा ई-पास घेणं बंधनकारक आहे. बबलमध्ये पोहोचण्यासाठी टेस्ट बंधनकारक आयपीएलच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्याआधी खेळाडू आणि संबंधितांना तीनवेळा आरटी-पीसीआर टेस्ट करणं गरजेचं आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना आयपीएलच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करता येईल. हॉटेलमध्ये वेगळं चेक-इन काऊंटर खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हॉटेलमध्ये वेगळं चेक-इन काऊंटर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडू हॉटेल रूमपासून ते मैदानापर्यंत बाहेरच्या लोकांच्या संपर्कात येणार नाहीत. बीसीसीआय अधिकारी-खेळाडूंमध्ये संपर्क नाही बीसीसीआयचे अधिकारी कोणत्याही बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकणार नाही. तसंच त्यांना खेळाडूंनाही भेटता येणार नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, IPL 2021, Mumbai Indians, RCB, Rules, Sports

    पुढील बातम्या