मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : T20 World Cup खेळणारे 10 खेळाडू बाहेर! 6 जण फेल

IPL 2021 : T20 World Cup खेळणारे 10 खेळाडू बाहेर! 6 जण फेल

आयपीएल 2021 (IPL 2021) ला टी-20 वर्ल्ड कपसाठीची (T20 World Cup) तयारी म्हणून महत्त्वाचं मानलं जात होतं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले 60 पैकी 58 सामने झाले आहेत, म्हणजेच स्पर्धा जवळपास संपुष्टात आली आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) ला टी-20 वर्ल्ड कपसाठीची (T20 World Cup) तयारी म्हणून महत्त्वाचं मानलं जात होतं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले 60 पैकी 58 सामने झाले आहेत, म्हणजेच स्पर्धा जवळपास संपुष्टात आली आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) ला टी-20 वर्ल्ड कपसाठीची (T20 World Cup) तयारी म्हणून महत्त्वाचं मानलं जात होतं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले 60 पैकी 58 सामने झाले आहेत, म्हणजेच स्पर्धा जवळपास संपुष्टात आली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 12 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) ला टी-20 वर्ल्ड कपसाठीची (T20 World Cup) तयारी म्हणून महत्त्वाचं मानलं जात होतं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले 60 पैकी 58 सामने झाले आहेत, म्हणजेच स्पर्धा जवळपास संपुष्टात आली आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी 10 खेळाडू आयपीएलमधून बाहेर झाले आहेत, यातल्या 6 खेळाडूंची कामगिरी मागच्या मोसमापेक्षा खराब झाली, तर 4 जणांची कामगिरी ठिकठाक राहिली. विराट कोहलीला अपेक्षेप्रमाणे रन करता आल्या नाहीत तर रोहित शर्मा मागच्या वर्षीपेक्षा चांगला खेळला. 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

विराट कोहलीची (Virat Kohli) टीम आरसीबीचा एलिमिनेटर सामन्यात कोलकात्याने (RCB vs KKR)पराभव केला. कोहलीने या मोसमात 15 मॅचमध्ये 29 च्या सरासरीने 405 रन केले, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 119 चा होता. या मोसमात विराटला फक्त 3 अर्धशतकं करता आली. 2020 साली कोहलीने 15 सामन्यांमध्ये 42 च्या सरासरीने 466 रन केले होते, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 121 होता. मागच्या मोसमातही विराटला तीनच अर्धशतकं करता आली होती.

रोहित शर्माने (Rohit Sharma) या मोसमातल्या 13 सामन्यांमध्ये 29 च्या सरासरीने 381 रन केले. यावेळी रोहितला फक्त एकच अर्धशतक करता आलं. मागच्या मोसमात रोहितने 12 मॅचमध्ये 28 च्या सरासरीने 332 रन केले, म्हणजेच रोहितची कामगिरी सुधारली असली तरी त्याला स्वत:च्या नावाला साजेसा खेळ करता आला नाही.

केएल राहुलची उल्लेखनीय कामगिरी

पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) कामगिरीमध्ये मात्र सातत्य राहिलं आहे. या मोसमात राहुलने 13 सामन्यांमध्ये 63 च्या सरासरीने 626 रन केले, यात 6 अर्धशतकं आहेत. तसंच त्याने 139 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. या मोसमात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमातही राहुलने 670 रन केले होते.

मुंबई इंडियन्सचा आणखी एक खेळाडू सूर्युकमार यादवदेखील (Suryakumar Yadav) या मोसमात अपयशी ठरला. 14 सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने त्याने 317 रन केले आणि 2 अर्धशतकं लगावली. मागच्या मोसमात त्याने 40 च्या सरासरीने आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 480 रन केले होते.

हार्दिक-इशानही फेल

हार्दिक पांड्यादेखील (Hardik Pandya) दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. आयपीएलच्या या मोसमात त्याने एकदाही बॉलिंग केलेली नाही. तर बॅटिंगमध्येही त्याला कमाल दाखवता आली नाही. 12 मॅचमध्ये 14 च्या सरासरीने त्याने 127 रन केले, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 113 चा होता. नाबाद 40 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. 2020 साली त्याने 14 मॅचमध्ये 35 च्या सरासरीने 281 रन केले होते, तेव्हा त्याचा स्ट्राईक रेटही 179 चा होता. तसंच त्याने एक अर्धशतकही केलं होतं.

इशान किशनने (Ishan Kishan) या मोसमात 10 सामन्यांमध्ये 27 च्या सरासरीने 241 रन केले, यात दोन अर्धशतकं होती, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 134 चा राहिला. मागच्या मोसमात त्याने 14 सामन्यांमध्ये 57 च्या सरासरीने 516 रन केले होते आणि 4 अर्धशतकं लगावली होती. इशानचा स्ट्राईक रेटही मागच्यावेळी 146 चा होता.

चहर-भुवनेश्वरने वाढवली चिंता

मुंबईचा लेग स्पिनर राहुल चहरने (Rahul Chahar) 11 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या. मागच्या मोसमात त्याला 15 विकेट मिळाल्या होत्या. तर भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) 11 मॅचमध्ये फक्त 6 विकेट मिळवल्या. भुवीचा इकोनॉमी रेटही 8 च्या आसपास राहिला. मागच्या मोसमात त्याने दुखापतीमुळे फक्त 4 सामने खेळले होते. 2019 साली त्याला 15 सामन्यांमध्ये 13 विकेट मिळाल्या होत्या.

बुमराह-शमीचा फॉर्म कायम

पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमीची (Mohammad Shami) कामगिरी या मोसमात चांगली झाली. 14 मॅचमध्ये त्याने 19 विकेट मिळवल्या. त्याची सरासरी 21 ची आणि इकोनॉमी रेट 7.50 चा होता. मागच्या मोसमात शमीला 20 विकेट मिळाल्या होत्या. तर मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 14 मॅचमध्ये 21 विकेट पटकावल्या. 20 च्या सरासरीने आणि 7.45 च्या इकोनॉमी रेटने बुमराहने बॉलिंग केली. मागच्या मोसमात बुमराहला 27 विकेट मिळाल्या होत्या. टी-20 वर्ल्ड कपआधी भारताचे हे दोन्ही फास्ट बॉलर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

First published:

Tags: IPL 2021, T20 world cup, Team india