Home /News /sport /

ठरलं! 'या' दोन संघांमध्ये होणार IPL फायनल, युवीच्या भविष्यवाणीनं घाबरली RCB

ठरलं! 'या' दोन संघांमध्ये होणार IPL फायनल, युवीच्या भविष्यवाणीनं घाबरली RCB

गुणतालिकेत सध्या पंजाबचा संघ 6 गुणांसह आता सहाव्या स्थानी पोहचला आहे. लीगच्या सुरुवातीपासून हा संघ तळाशी होता.

    दुबई, 19 ऑक्टोबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामात सध्या सर्व संघ प्ले ऑफ (IPL PlayOffs)गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. रविवारी झालेल्या दोन सुपरओव्हरमुळे गुणतालिकेत मोठा बदल झाला. किंग्ज इलेव्हनं पंजाबनं (Kings XI Punjab) मुंबईला (Mumbai Indians) दोन सुपरओव्हरमध्ये हरवल्यानंतर आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर मुंबईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ अव्वल स्थानी आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या सुपर ओव्हरमध्ये रोमांच पाहायला मिळाला. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबनं विजय मिळवत प्ले ऑफच्या शर्यतीत आपण कायम असल्याचे दाखवून दिले आहे. या सामन्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं ट्वीट करत, "या सामन्यात निकोलस पूरन गेम चेंजर ठरू शकतो. तो शानदार फॉर्ममध्ये आहे. माझी भविष्यवाणी अशी आहे की, किंग्स इलेव्हन पंजाब प्ले ऑफमध्ये जागा मिळवून फायनलमध्ये त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्स किंवा मुंबई इंडियन्सची होईल". युवीच्या भविष्यवाणीनंतर मात्र गुणतालिकेच 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेला RCBचा संघ घाबरला आहे. वाचा-6 सामने गमावूनही पंजाब गाठणार प्ले ऑफ? पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल युवीनं ट्वीट केल्यानंतर RCBचा गोलंदाज युझवेंद्र चहलनं, "मग आम्ही भारतात परत येऊ का?", असा प्रश्न चहलला विचारला. वाचा-40 ओव्हरचा सामना 12 चेंडूत संपला! फक्त 6 मिनिटांत पाहा डबल सुपर ओव्हरचा थरार यावर युवीनं चहरला उत्तर देत, "अजून थोडे सिक्स आणि विकेट घेऊन ये". यानंतर चहलनं पुन्हा, "ठीक आहे. 10 नोव्हेंबरचं तिकिटं काढतो आणि सिक्सही खातो", असे ट्वीट केल्यानंतर युवीनं पुन्हा एकदा चहलची फिरकी घेत फायनल नक्की बघून ये असे ट्वीट केले. वाचा-IPL 2020 : ...म्हणून रोहित शर्मा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला आला नाही गुणतालिकेत सध्या पंजाबचा संघ 6 गुणांसह आता सहाव्या स्थानी पोहचला आहे. लीगच्या सुरुवातीपासून हा संघ तळाशी होता. मात्र बॅंगलोर आणि मुंबईला हरवल्यानंतर पंजाबच्या प्ले ऑफ गाठण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर, मुंबईनं सामना गमावल्यानंतरही 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्लीचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा संघही 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हे तीन संघ प्ले ऑफ गाठू शकतात. मात्र चौथा संघ कोण असेल हे पाहणे महत्त्वाचे असेल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Mumbai Indians, RCB, Yuvraj singh

    पुढील बातम्या