Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : या देशात IPL चे सामने रंगणार; केवळ एका गोष्टीची प्रतीक्षा

IPL 2020 : या देशात IPL चे सामने रंगणार; केवळ एका गोष्टीची प्रतीक्षा

धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले 8 महिने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं यावर्षात धोनी क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो. धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत तब्बल 190 सामने खेळले आहेत. यात त्यानं 23 अर्धशतकांह 4432 धावा केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPL मध्ये अधिक खबरदारी घेतली जाणार आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 21 जुलै : देशात सर्वच क्रिकेट प्रेमी आतुर असलेल्या आयपीएल 2020 ची प्रतीक्षा संपली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये हे सामने रंगणार आहे.

ब्रीजेश पटेल, IPL कौन्सिल चेअरमन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ESPNcricinfo यांना माहिती दिली. पटेल म्हणाले की, पुढील बैठक झाल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल. गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएलचे सामने भारतात रंगणार की आणखी कोणत्या देशात याबाबत चर्चा सुरू होती. अखेर क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा संपली आहे. UAE मध्ये हे सामने रंगणार असल्याचे आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ब्रीजेश पटेल यांनी सांगितले आहे. मात्र अद्यापही भारत सरकारची परवानगी मिळाली नसून त्यानंतरचं सामन्यांची संपूर्ण आखणी करण्यात येईल, असं पटेल यांनी पुढे सांगितलं.

पटेल यांनी आयपीएलची तारीख अद्याप नक्की सांगितली नाही. मात्र ESPNcricinfo नुसार सप्टेंबर 26 ते नोव्हेंबर 7 यादरम्यान हे सामने रंगणार आहेत.

हे वाचा-अरे बापरे! चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह निघाला पाकिस्तानचा खेळाडू

यादरम्यान 60 सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे. पटेल पुढे म्हणाले की – अबू दाबी, दुबई, शारजाह ही तीन मुख्य ठिकाणं असणार आहे. सरकारच्या परवानगीनंतर लीगचा संपूर्ण प्लान आखण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

First published:

Tags: UAE