IPL 2020 : नेट रनरेट यावर्षीही KKR चा घात करणार?

आयपीएल (IPL 2020) चा यंदाच्या मोसमातला ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि हैदराबाद (SRH)यांच्यात होत आहे. या मॅचवरच कोलकाता (KKR) आणि हैदराबादचं प्ले-ऑफचं भवितव्य अवलंबून आहे.

आयपीएल (IPL 2020) चा यंदाच्या मोसमातला ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि हैदराबाद (SRH)यांच्यात होत आहे. या मॅचवरच कोलकाता (KKR) आणि हैदराबादचं प्ले-ऑफचं भवितव्य अवलंबून आहे.

  • Share this:
    शारजाह, 3 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) चा यंदाच्या मोसमातला ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि हैदराबाद (SRH)यांच्यात होत आहे. लीग स्टेजमधली ही शेवटची मॅच असली तरी प्ले-ऑफसाठीची शेवटची टीम अजूनही निश्चित झाली नाही. प्ले-ऑफसाठी हैदराबाद आणि कोलकाता यांचं भवितव्य मुंबईच्या हातात आहे. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला तर कोलकाता प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, तर दुसरीकडे हैदराबादने विजय मिळवला, तर त्यांना प्ले-ऑफचं स्थान मिळेल. आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने बँगलोरचा पराभव केला. पण दिल्लीने मॅच जिंकण्यासाठी 17.2 ओव्हरपेक्षा जास्त वेळ घेतल्यामुळे बँगलोर आणि दिल्ली या दोन्ही टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या. हैदराबादने या मोसमात 13 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. मुंबईविरुद्धची मॅच जर जिंकला आली तर हैदराबाद 7 पैकी 7 मॅच जिंकेल. तर कोलकात्यानेही त्यांच्या 7 पैकी 7 मॅच जिंकल्या असून उरलेल्या 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. कोलकाता आणि हैदराबादचे 14 पॉइंट्स समान झाले तर नेट रनरेटमुळे हैदराबाद प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल आणि कोलकात्याचं स्वप्न भंगेल. मागच्यावर्षीही नेट रनरेटनेच कोलकात्याचा घात केला होता. 2019 साली 56 मॅचनंतर मुंबई आणि चेन्नईचे 18 पॉइंट्स होते. तसंच हैदराबादने मागच्यावेळी 12 पॉइंट्ससह प्ले-ऑफ गाठली होती. मुख्य म्हणजे हैदराबादप्रमाणेच कोलकात्याचेही 12 पॉइंट्स होते, पण हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे कोलकात्याला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नव्हता. यावेली कोलकात्याचा नेट रनरेट - 0.214 आहे, तर हैदराबादचा नेट रनरेट 0.555 इतका आहे.
    Published by:Shreyas
    First published: