Home /News /sport /

IPL 2020 : हार्दिक-कृणालमधला 'स्मार्ट पांड्या' कोण? पोलार्डने दिलं उत्तर

IPL 2020 : हार्दिक-कृणालमधला 'स्मार्ट पांड्या' कोण? पोलार्डने दिलं उत्तर

आयपीएल (IPL 2020)च्या या मोसमामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुंबई (Mumbai Indians)चा ऑल-राऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने टीममधल्या दोन्ही पांड्या बंधूंबाबत भाष्य केलं आहे.

    दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या या मोसमामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुंबई (Mumbai Indians)चा ऑल-राऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने टीममधल्या दोन्ही पांड्या बंधूंबाबत भाष्य केलं आहे. मुंबईने ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये पोलार्ड दोन्ही पांड्या बंधूंसोबतच्या आपल्या ऑन-फिल्ड आणि ऑफ-फिल्ड समीकरणाबद्दल बोलताना दिसत आहेत. 'ते जसे आहेत तसे, ते दोघेही सर्वांना आवडतात. ते कोणालाही न आवडणं खूप कठीण आहे. हार्दिक आणि त्याचा आत्मविश्वास, काहीही असो, त्याचा आत्मविश्वास कायम असतो, तो नेहमी आनंदी असतो, तो नेहमीच सर्वांसाठी मदतीला उभा असतो, तो जबरदस्तच आहे. आणि दुसरीकडे क्रुणाल, जसं मी नेहमी म्हणतो, एक आहे हार्दिक पांड्या आणि दुसरा आहे स्मार्टर पांड्या. आमचं एकंदरीत असंच सगळं मजेशीर चालतं,' असं पोलार्ड या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय. 'ते खूप मोकळ्या विचारांचे आणि जोरदार आहेत, पण ते फक्त ऑफ फिल्ड पुरतं नाही. जेव्हा ते क्रिकेटच्या मैदानावर जातात तेव्हाही ते जोरदार खेळतात, विशेषतः हार्दिक! तो जातो, तो दमदार खेळ दाखवत असतो, नेहमीच त्याचा आत्मविश्वास दिसतो. आमच्यात अनेक बाबतींत साम्य आहे,' असं पोलार्ड म्हणाला. पोलार्ड सांगतो की मैदानाबाहेरचे त्यांचे हे संबंध मैदानावरही तसेच आहेत. ह्या त्रिकुटाचे ऑन फिल्डही अनेक भावनिक किस्से आहेत. पोलार्ड म्हणतो की त्यांच्यात एक समजूतदारपणा आहे जो खेळाताना, गंभीर चर्चा होत असताना दिसून येतो. 'जेव्हा आम्ही मैदानाबाहेर असतो तेव्हा सगळीकडे मज्जा मस्ती असते, पण मैदानात असताना आमच्यात सामन्याविषयी अनेकदा चर्चा होते. आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि एकमेकांना समजून घेतो. हे सगळं आमच्यात चालतं,' असं पोलार्डने सांगितलं. पोलार्ड, पंड्या बंधू आणि त्यांची 'पलटण' आज आयपीएलच्या फायनलमध्ये दिल्लीचा सामना करायला सज्ज आहे. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाल्यास त्यांच्यासाठी हा आयपीएलचा पाचवा विजय ठरेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या