Home /News /sport /

IPL 2020 : 'ते सुपरओव्हरचं सोडा, ही मुलगी कोण सांगा!' कॅमेऱ्यासमोर झळकलेल्या मिस्ट्री गर्लचं रहस्य अखेर उलगडलं

IPL 2020 : 'ते सुपरओव्हरचं सोडा, ही मुलगी कोण सांगा!' कॅमेऱ्यासमोर झळकलेल्या मिस्ट्री गर्लचं रहस्य अखेर उलगडलं

IPL 2020 दरम्यान रविवारी मुंबई विरुद्ध पंजाब (MI Vs KXIP) सामना डबल सुपरओव्हरपर्यंत पोहोचला. पण या सामन्याच्या रोमहर्षक क्षणी टीव्ही स्क्रीवर अनपेक्षितपणे एका सुंदर पण चिंताग्रस्त चेहरा केलेली मुलगी अवतरली. कोण आहे ही Mystery girl?

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 ऑक्टोबर :  आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत (IPL 2020) रविवारी संध्याकाळी क्रिकेटप्रेमींना मेजवानी मिळाली. दोन सामन्यात मिळून तीन सुपरओव्हर खेळल्या गेल्या कारण दोन्ही सामने टाय झाले होते. रात्री उशीरा मुंबई इंडियन्स आणि किंग्जस इलेव्हन पंजाब  (MI Vs KXIP) यांच्यामध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाबने बाजी मारली खरी, पण डबर सुपरओव्हरपेक्षाही एका वेगळ्याच गोष्टीने रसिकांचं लक्ष वेधलं गेलं. Coronavirus मुळे रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवले जात आहेत. त्यामुळे टीम मेंबर्स, टीमचे मालक किंवा कर्मचारी, कमेंटेटर्स अशा नेहमीचे चेहरेच प्रेक्षकांमध्ये बघायची सवय असलेल्या क्रिकेट रसिकांना अचानक एका सुंदर तरुणीचा चिंताग्रस्त चेहरा दिसला. ही मिस्ट्री गर्ल (Mystery girl during IPL) कोण याचीच चर्चा दिवसभर सोशल मीडियावर सुरू आहे. मुंबई -पंजाबचा हा सामना टाय झाला. मग सुपरओव्हर झाली. तीसुद्धा टाय झाली. अखेर मुंबईविरुद्धचा हा सामना पंजाबने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये जिंकला, IIPL च्या इतिहासात पहिल्यांदा या सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. पण या सुपरओव्हरची चर्चा होते आहे, तेवढीच चर्चा ही तरुणी कोण याची होते आहे. कॅमेरामनने ऐन मोक्याच्या क्षणी या मुलीच्या चेहऱ्यावरची चिंता टिपली. म्हणून त्याचं कौतुक होतंय आणि गंमत म्हणजे नेटिझन्सनी या मुलीची ओळखही शोधून काढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर UAE मध्ये रिकाम्या स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जात आहेत. परंतु टीव्हीवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खोटा आवाज देण्यात येत असून यामुळे टीव्हीवरील प्रेक्षकांनादेखील रिकामेपणा जाणवत नाही. यंदा कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये जाऊन आयपीएल सामने पाहण्याची संधी मिळालेली नाही. प्रेक्षकांमध्ये दिसणाऱ्या नेहमीच्या ओळखीच्या चेहऱ्यांव्यतिरिक्त ही मुलगी कॅमेऱ्यात अचानक दिसल्याने अनेकांची उत्सुकता ताणली गेली. दरवर्षी आयपीएलदरम्यान कॅमेरामन त्यांचं काम उत्तमरीत्या पार पाडत असतात. प्रेक्षकातला हा मिस्ट्री गर्लचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कॅमेरामनचं कौतुक होत आहे. या मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. ही मुलगी कोण याची चर्चा सुरू झाल्यावर काही जणांनी ही मुंबई इंडियन्सचा बॅट्समन ईशान किशन याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं आहे. काही अतिउत्साही नेटिझन्सनी या तरुणीचं सोशल मीडिया अकाउंट शोधून तिथेही हा फोटो टॅग केला.  त्याचबरोबर या मिस्ट्री गर्लनेसुद्धा चक्क आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या फोटोचा स्क्रिनशॉट अपलोड केला आहे. त्यामुळे सध्या ती ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असून ती नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी नेटिझन्स उत्सुक आहेत. ही मिस्ट्री गर्ल कोण हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नसलं, तरी रिया लालवाणी नावाचं इन्स्टाग्राम अकाउंट काही लोकांनी शोधून काढलं आहे. या अकाउंटवरूनही कालच्या सामन्याची insta story शेअर झालेली दिसते.  आता ही रिया ललवाणी खरंच ईशानची गर्लफ्रेंड आहे का आणि हे खरंच तिचं अकाउंट आहे की फेक अकाउंट आहे, याची शहानिशा अद्याप झालेली नाही. पण या अकाउंटवरूनही तिने स्वतःच आपले व्हायरल झालेले फोटो आणि मीम्स शेअर करून धमाल उडवून दिली, हे मात्र खरं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या