पॉइंट टेबलमध्ये अशी केली किंग्ज इलेव्हन पंजाबनं ‘हेरा फेरी’, मुंबईकर खेळाडूचं ट्वीट व्हायरल

पॉइंट टेबलमध्ये अशी केली किंग्ज इलेव्हन पंजाबनं ‘हेरा फेरी’, मुंबईकर खेळाडूचं ट्वीट व्हायरल

कोलकाताला नमवतं पंजाबनं सलग पाचवा विजय मिळवला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून निराश असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

शारजा, 27 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. कोलकाताला नमवतं पंजाबनं सलग पाचवा विजय मिळवला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून निराश असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या चाहत्यांना दिलासा मिळाला असून पंजाबचा बॅटिंग कोच आणि मुंबईकर खेळाडू वसीम जाफरनं आनंद व्यक्त केला आहे.

या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या 150 धावांचा पाठलाग करताना क्रिस गेल आणि मंदीप सिंग यांनी केलेल्या भागीदारीमुळे पंजाबला हा विजय मिळवणं सोपं झाले. दोघांच्याही अर्धशतकी भागीदारीमुळे पंजाबने कोलकात्याचा 8 विकेट आणि 7 बॉल राखून पराभव केला. दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. पण शेवटी पंजाबचा संघ वरचढ ठरला. सामन्यात वसीफ जाफरनं मीमच्या माध्यमातून संघाला प्रेरणा देण्याचे काम केलं आहे.

वाचा-पंजाबच्या विजयानं आता विराट आणि रोहितचीही चिंता वाढली! बदलली प्ले ऑफची समीकरणं

वाचा-IPL 2020 : कधी घेणार युनिव्हर्सल बॉस निवृत्ती? स्वत: दिलं उत्तर

यामध्ये त्यांनी हिंदी चित्रपट ‘फिर हेरा फेरी’च्या एका डायलॉगचे मिम बनवत ते पोस्ट केले आहे. ‘या मीममध्ये या चित्रपटातल्या सीनमध्ये अभिनेता अक्षय कुमार दिसत आहे. त्या फोटोवर लिहिलंय बेटे एक जमाना था जब हम भी बॉटम 4 में हुआ करते थे.’ यातून जाफर याने पंजाबचा संघ गुणतालिकेत एकेकावी तळाशी होता हे सांगितले. जाफरनं हे ट्वीट केल्यानंतर चाहत्यांनी देखील विविध ट्विट करत संघाला आणि जाफरना पाठिंबा दर्शवला आहे.

वाचा-रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट! हिटमॅन IPL खेळणार की नाही?

दरम्यान, या गेलने या सामन्यात 29 बॉलमध्ये 51 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने पाच षटकार मारले तर मनदीप सिंगने नाबाद 66 धावांची खेळी केली. या दोघांच्या शानदार खेळीने पंजाबने सलग पाचवा विजय मिळवला असून प्लेऑफमधील आपल्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. या विजयासह पंजाबने 12 गुण मिळवले असून पॉईंट्स टेबलमध्ये देखील चौथ्या क्रमांकावर उडी मारली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 27, 2020, 4:48 PM IST
Tags: kl rahul

ताज्या बातम्या