स्पोर्ट्स

  • associate partner

विराटची RCBच्या कर्णधारपदावरून होणार हकालपट्टी? संघ मालकांनी केले मोठे वक्तव्य

विराटची RCBच्या कर्णधारपदावरून होणार हकालपट्टी? संघ मालकांनी केले मोठे वक्तव्य

विराटची आरसीबीच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करणार असल्याच्याही चर्चा होता. याबाबत टीमचे चेअरमन यांनी मोठे व्यक्तव्य केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. या हंगामाची सुरुवात युएइमध्ये 19 सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी जवळजवळ सर्व संघ या हंगामासाठी दुबईला पोहचले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आरसीबीसह शुक्रवारी दुबईला पोहचला. आरसीबीनं गेल्या 12 वर्षात एकदाही विजेतेपद मिळवले नाही आहे. त्यामुळे या हंगामात विराट आपल्या संघाचा पहिले विजेतेपद मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे. विराटची आरसीबीच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करणार असल्याच्याही चर्चा होता. याबाबत टीमचे चेअरमन यांनी मोठे व्यक्तव्य केले आहे.

आरसीबीचे चेअरमन संदीप चुरीवाला यांनी सांगितले की, 'विराट भारतीय संघाचा कर्णधार असून त्याचे सर्वाधिक चाहते आहेत. आमचे विराटवर खूप प्रेम आहे आणि आम्ही त्याच्याशी जोडल्यामुळे आनंद होत आहे. कधी तुम्ही जिंकता, कधी हरता पण मला या संघावर फार अभिमान आहे. संघ निवडीबद्दल बोलताना ते म्हणाले की, खेळाडूंची खरेदी करताना कोअर टीम तयार होईल, असा प्रयत्न करण्यात आला आहे. प्लेइंग इलेव्हनमधल्या प्रत्येक खेळाडूची भूमिका असते.

वाचा-IPL 2020 चे काउंटडाउन सुरू! ‘या’ तीन संघाचे गोलंदाज उडवणार फलंदाजांची झोप

कोहली एकटा दुबईला पोहोचला

युजवेंद्र चहल, उमेश यादव, नवदीप सैनी आणि उर्वरित आरसीबी संघातील खेळाडू काही दिवसांपूर्वी बंगळुरूला पोहोचले. हे सर्व खेळाडू एक आठवडा आयसोलेशनमध्ये होते, त्यानंतर दुबईला रवाना झाले. यावेळी कर्णधार कोहली त्यांच्यासोबत नव्हता. 22 ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेतील तीन क्रिकेटपटू संघात सामील झाले. एबी डिव्हिलियर्स, ख्रिस मॉरिस आणि डेल स्टेन हेदेखील दुबईला पोहोचले आहेत. जैविक सुरक्षा पाहता कोहली एकटाच चार्टर्ड प्लेनमधून दुबईला आला.

वाचा-IPLमध्ये विजेत्या संघापेक्षा जास्त आहे मुंबई इंडियन्सच्या ‘या’ 7 खेळाडूंची कमाई!

तीनवेळा आरसीबीनं फायनलपर्यंत मारली मजल

गेल्या 12 वर्षाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एकदाही आयपीएल चॅम्पियन होऊ शकला नाही आहे. मात्र हा संघ तीनवेळा फायनलपर्यंत पोहचू शकला आहे. संघाने 2009.2011 आणि 2016मध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती. गेल्या 3 हंगामात मात्र संघाचे प्रदर्शन चांगले नव्हते. त्यामुळे युएइमध्ये संघाकडून चांगल्या खेळीची विराटला आशा आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 23, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या