IPLमध्ये एकही विजेतेपद न मिळालेल्या विराटला रोहित, धोनीपेक्षा मिळतो जास्त पगार

IPLमध्ये एकही विजेतेपद न मिळालेल्या विराटला रोहित, धोनीपेक्षा मिळतो जास्त पगार

असा आहे आयपीएल खेळणाऱ्या टॉप खेळाडूंचा पगार.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : जगातील सर्वात महागडी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी 4-5 महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना 8ही संघांनी जोरात तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलच्या या हंगामासाठी डिसेंबरमध्ये लिलाव होणार आहे. त्याआधी सर्व संघांनी महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन तर काही खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल ही अशी एक स्पर्धा आहे, जिथे खोऱ्यानं पैसे खर्च केले जातात. यात टीम इंडियातील स्टार खेळाडूंना सर्वात जास्त मानधन दिले जाते. यात रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली टॉपवर आहेत. रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीस आयपीएलमध्ये सर्वात जास्त कमवणारे खेळाडू आहेत. या खेळाडूंच्या मानधनाच्या आसपास एकही खेळाडू नाही आहे. यातही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सर्वात जास्त कमवो. विराट कोहलीचे मानधन हे रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा जास्त आहे. याबाबत बीसीसीआयनं सार्वजनिकरित्या माहिती दिली आहे.

वाचा-वडील 94 हजार कोटींचे मालक पण अवघ्या 30 लाखांसाठी IPL खेळत होता मुलगा

विराट, रोहित आणि धोनीचे आयपीएल मानधन

आयपीएलममध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार आहे. मात्र विराटला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. असे असले तरी आयपीएलमध्ये सर्वात जास्त मानधन मिळवणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे. विराटला आरसीबी संघाकडून 17 कोटी रुपये मिळतात. तर, चार वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माला 15 कोटी मानधन मिळते. तेवढेच मानधन सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मिळते.

वाचा-IPL लिलावाआधी बंगळुरू आणि मुंबई संघानं दिग्गजांना डच्चू, 19 खेळाडू संघाबाहेर

धोनी-रोहितच्या पंगतीत ऋषभ पंत

महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतलाही धोनी एवढाच पगार मिळतो. पंत हा सध्या आयपीएलमधून दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंत सर्वात युवा खेळाडू असून सर्वात जास्त विजेतेपद असलेल्या धोनी आणि रोहितला समान पगार आहे.

वाचा-मुंबईकर खेळाडू आता होणार दिल्लीकर! 9 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

आयपीएलमध्ये सर्वात जास्त मानधन असलेले खेळाडू

1. विराट कोहली (RCB) - 17 कोटी

2. एमएस धोनी (CSK) - 15 कोटी

3. रोहित शर्मा (MI) - 15 कोटी

4. ऋषभ पंत (DC) - 15 कोटी

5. स्टिव्ह स्मिथ (RR) - 12.50 कोटी

6. डेव्हिड वार्नर (SRH)- 12.50 कोटी

7. बेन स्टोक्स (RR) - 12.50 कोटी

8. सुनील नरेन (KKR) - 12.50 कोटी

9. सुरेश रैना (CSK) - 11 कोटी

10. मनीष पांडे (SRH) - 11 कोटी

11. केएल राहुल (KXIP) - 11 कोटी

12. हार्दिक पांड्या (MI) - 11 कोटी

13. एबी डिविलियर्स (RCB) - 11 कोटी

14. राशिद खान (SRH) - 9 कोटी

15. क्रुणाल पांड्या (MI) - 8.80 कोटी

16. भुवनेश्वर कुमार (SRH) - 8.50 कोटी

17. आंद्रे रसेल (KKR) - 8.50 कोटी

18. संजू सॅमसन (RR) - 8 कोटी

19. केदार जाधव (CSK) - 7.80 कोटी

20. आर अश्विन (DC) - 7.60 कोटी

21. दिनेश कार्तिक (KKR) - 7.40 कोटी

22. जोफ्रा आर्चर (RR) - 7.20 कोटी

23. जसप्रीत बुमराह (MI) - 7 कोटी

24. श्रेयस अय्यर (DC) - 7 कोटी

25. रवींद्र जडेजा (CSK) - 7 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2019 05:23 PM IST

ताज्या बातम्या