Home /News /sport /

IPL 2020: धोनीला बोल्ड केल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घेण्यासाठी पोहोचला वरुण चक्रवर्ती, पाहा VIDEO

IPL 2020: धोनीला बोल्ड केल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घेण्यासाठी पोहोचला वरुण चक्रवर्ती, पाहा VIDEO

वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) ने यावर्षी उत्तम गोलंदाजी केली आहे. यावर्षीच्या हंगामात त्याने केकेआरसाठी (KKR) सर्वाधिक 15 विकेट्स घेतल्या आहेत.

  दुबई, 30 ऑक्टोबर : एम एस धोनी (MS Dhoni) हे नवख्या खेळाडूंसाठी चालतं बोलतं विद्यापीठ आहे. मग खेळाडू स्वत:च्या टीम मधील असो किंवा प्रतिस्पर्धी संघातील, धोनी अनेकदा या न्यू कमर्सशी खेळासंदर्भात अत्यंत नम्रपणे संभाषण करताना दिसतो. धोनीचं 16 वर्षांचं दीर्घ करिअर, 538 आंतरराष्ट्रीय सामने, 17 हजारांहून अधिक धावा- आजही अनेकांसाठी स्वप्नवत आहे. अशावेळी धोनीसारख्या क्रिकेटपटूची विकेट घेणं एखाद्या गोलंदाजासाठी अभिमानाची बाब आहे. त्यात नवख्या खेळाडूने त्याचा क्लीन बोल्ड केल्यानंतर त्या खेळाडूच्या आनंदाला सीमाच राहणार नाही. कोलकाता नाइट रायडर्सचा तरुण स्पीनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)ने सलग दोन बेळा धोनीला बोल्ड केले आहे. वरुण जरी धोनीचा प्रतिस्पर्धी असला तरी तो त्याआधी त्याचा चाहता आहे. धोनीला पाहण्यासाठी तो नेहमी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर जात असे. मात्र बुधवारी सलग दुसऱ्यांदा वरुणच्या फिरकीसमोर धोनीची फलंदाजी चालली नाही. व्हायरल होतोय हा VIDEO सीएसके vs केकेआर या सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये वरुण चक्रवर्ती चेन्नईचा कर्णधार धोनीशी बातचीत करत आहे. असे दिसत आहे की वरुण धोनीकडून काही टिप्स घेत आहे. 16 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये असे आहे की, धोनी आणि चक्रवर्ती डग आऊटजवळ उभे आहेत आणि वरुण धोनीचा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकत आहे.
  दुसऱ्यांदा केलं बोल्ड चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या पहिल्या सामन्यातही चक्रवर्तीनेच धोनीला बोल्ड केलं होतं. सामन्यानंतर चक्रवर्तीने धोनीबरोबर सेल्फी देखील घेतला होता. तेव्हा हा फोटो देखील व्हायरल झाला होता. या सामन्यानंतर चक्रवर्तीने असे म्हटले होते की, तीन वर्षांपूर्वी तो गर्दीत बसून धोनीची मॅच पाहण्यासाठी चेन्नईतील मैदानावर येत असे. (हे वाचा-धोनी सगळ्यात सन्मानित, तर टीम इंडियाचा हा क्रिकेटपटू सर्वाधिक वादग्रस्त) वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीचं यावर्षी कौतुक होत आहे. त्याने या हंगामामध्ये केकेआरसाठी सर्वाधिक 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या उत्तम प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील वरुणला संघात स्थान देण्यात आले आहे. क्रिकेटमधील जाणकार त्याला मिस्ट्री स्पिनर म्हणत आहेत. मिस्ट्री याकरता कारण त्याच्या पोतडीत हरतऱ्हेचा बॉल आहे. तो ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर आणि टॉप स्पिन या प्रत्येक पद्धतीचा बॉल टाकू शकतो.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: IPL 2020

  पुढील बातम्या