मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचे खेळाडू वापरणार एक विशेष डिव्हाइस, कोरोनाविरोधात असं करेल काम!

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचे खेळाडू वापरणार एक विशेष डिव्हाइस, कोरोनाविरोधात असं करेल काम!

याआधीही अमेरिकेच्या एनबीएमध्ये अशाच प्रकारचे हेल्थ किट वापरण्यात आले होते.

याआधीही अमेरिकेच्या एनबीएमध्ये अशाच प्रकारचे हेल्थ किट वापरण्यात आले होते.

याआधीही अमेरिकेच्या एनबीएमध्ये अशाच प्रकारचे हेल्थ किट वापरण्यात आले होते.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 06 सप्टेंबर : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. पण अशाही परिस्थितीत इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलचे सामने येत्या 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवले जाणार आहे. मुंबई इंडियन्स संघाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. गतविजेती आयपीएलची चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून एक खास रिंग आणली आहे.  ही रिंग प्रत्येक खेळाडूला देण्यात येणार आहे. यामध्ये खेळाडूला एक डिव्हाइस वापरावे लागणार आहे. या डिव्हाइसमुळे खेळाडू हार्ट रेट, शरिरात होणारे बदल, रेस्पिरेटरी रेट आणि शरीराचे तापमान दाखवणार आहे. खेळाडूला काही त्रास झाला तर याची माहिती लगेच डॉक्टरांच्या टीमला कळणार आहे. याआधीही अमेरिकेच्या एनबीएमध्ये अशाच प्रकारचे हेल्थ किट वापरण्यात आले होते. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हे खास डिव्हाइस वापरणार आहे. खेळाडूंच्या माघारीने चिंता आयपीएल 2020 (IPL 2020) तेराव्या हंगामाला दोन आठवडे शिल्लक असताना खेळाडू माघार घेण्याचा प्रकार सुरूच आहे. याआधी चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फलंदाज सुरेश रैनानं आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. हरभजन सिंगचीही माघार हरभजन सिंगने UAE मध्ये होणारा आयपीएलचा 13 वा हंगाम आपण खेळू शकत नसल्याचं जाहीर केलं आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण भारत सोडू शकणार नसल्याचं सांगितलं आहे. CSK चा संपूर्ण संघ गेल्याच आठवड्यात दुबईला पोहोचला. पण या संघाबरोबर हरभजन गेलेला नव्हता. तो नंतर UAE ला पोहोचेल, असं सांगण्यात येत होतं. संघ रवाना होण्यापूर्वी चेन्नईला झालेल्या पाच दिवसांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्येही हरभजन गैरहजर होता.  या सरावाच्या वेळी रवींद्र जडेजासुद्धा हजर नव्हता. पण जडेजा आता संघाबरोबर संयुक्त अरब अमिरातीला पोहोचला आहे. हरभजनने मात्र न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
First published:

Tags: Corona, Mumbai Indians, Rohit sharma

पुढील बातम्या