दुबई, 08 सप्टेंबर : कोरोनाच्या महासंकटात पुढे ढकलली गेलेली आयपीएल (IPL 2020) स्पर्धा अखेर आता होणार आहे. दुबईमध्ये ही स्पर्धा पार पडणार असून 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएई मधील शारजाह, दुबई आणि अबू धाबीमध्ये हे सामने होणार आहेत. सर्वच संघ स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले असून त्यांनी सरावाला सुरवात देखील केली आहे. यामध्ये खेळाडू विविध प्रकारचा सराव करताना दिसत आहेत. यात खेळाडू फुटबॉलही खेळताना दिसत आहेत.
अनेक संघ आपल्या खेळाडूंच्या सरावाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असतात. मात्र या सगळ्या संघांमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात अपलोड होत असतात. त्यांची सोशल मीडिया टीम आपल्या संघाला आणि चाहत्यांना जोडण्याचे उत्तम काम करत आहे. मात्र त्यांनी नुकतीच खेळाडूंच्या फुटबॉल खेळतानाचा फोटो पोस्ट करत त्यावर लिहिले कि, मेस्सी काही नवीन संघ सहकाऱ्यांच्या शोधात आहे. त्यामुळे या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वाचा-विराट आणि एबी डिव्हिलियर्सला मिळाली 'शांती', आता होणार 2016 सारखा चमत्कार!
We heard Messi was looking for some new teammates. 😉 ⚽️ #PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/whyx3OtoFN
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 6, 2020
वाचा-कोरोनाला घाबरले दिग्गज खेळाडू? आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतली IPLमधून माघार
मात्र यामध्ये महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी मेस्सीबार्सिलोना सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता मेस्सीने यावर स्पष्टीकरण दिले असून सध्या आपण कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी तयार नाही. तसेच कोर्ट आणि कचेरीसाठी देखील माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे आता हे वर्ष मेस्सी याच क्लबकडून फुटबॉल खेळताना दिसून येणार आहे.
वाचा-मोठी बातमी! क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली; IPL 2020 चं वेळापत्रक जारी
दरम्यान, मेस्सी बार्सिलोना सोडणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरल्यानंतर VFB Stuttgart या फुटबॉल क्लबच्या चाहत्यांनी gofundme नावाचे पेज सुरु करून त्यावरून मेस्सीला त्यांच्या आवडत्या क्लबमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. या माध्यमातून 900 मिलियन युरो इतकी रक्कम जमा करण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र या वर्षी आयपीएलकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष लागले असून यावर्षी ही स्पर्धा कोण जिंकणार याकडे लक्ष लागून आहे.