स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020: सलग चारवेळा दहावीत झाला होता नापास, आता IPL गाजवण्यासाठी सज्ज!

IPL 2020: सलग चारवेळा दहावीत झाला होता नापास, आता IPL गाजवण्यासाठी सज्ज!

अभ्यासात कच्चा असला तरी हा युवा खेळाडू गोलंदाजीच पक्का आहे, एकाच सामन्यात एकही धाव न देता 10 विकेट घेण्याचा रेकॉर्ड.

  • Share this:

दुबई, 18 सप्टेंबर : आयपीएलच्या तेराव्या (IPL 2020) हंगामाचं बिगूल 5 दिवसांनी वाजणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू या हंगामात युवा खेळाडूंवर सर्वांच्या नजरा आहेत. असाच एक युवा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. राजस्थानचा लोकल बॉय आकाश सिंहला गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात 20 लाखांना विकत घेतले. आकाशनं आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय किंवा आयपीएल सामना खेळलेला नाही. त्यामुळं अनकॅप्ड खेळाडूसाठी ही लागलेली जास्त बोली आहे. राजस्थान रॉयल्सनं आकाश सिंहला 20 लाखांना आपल्या संघात घेतले.

मुळचा भारतपूरचा असलेला डावखुरा मध्यम वेगवान गोलंदाज आकाश सिंह क्रिकेट खेळण्यासाठी जयपूरकडे वळला. अरावली क्रिकेट अकादमीमध्ये विवेक यादव यांच्या देखरेखीखाली आकाशनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. जवळपास 5 वर्षे या अकादमीमध्ये आकाश क्रिकेट खेळत होता.

वाचा-6 वर्षांआधी सुशांतच्या सिनेमात होता हिरो, आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार IPL

2017मध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्यानं एका सामन्यात एकही धाव न देता 10 विकेट घेतल्या होत्या. यानंतर राजस्थानची अंडर -16, अंडर -19, अंडर -23 आणि ज्येष्ठ संघात निवड झाली. प्रत्येक प्रकारात सातत्याने चमकदार कामगिरी करून तो यशाची शिखरं गाठत गेला. गेल्या वर्षी अंडर -23 मध्ये सलग चार सामन्यात त्यानं चांगली कामगिरी केली.

वाचा-'या' 20 वर्षीय खेळाडूच्या नावे अजब रेकॉर्ड, एकही गोलंदाज नाही आसपास

दहावीत झाला होता चारवेळा नापास

क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी करणारे खेळाडू क्वचितच अभ्यासात चांगले असतात. अशाच आकाश सिंहला आयपीएलनं मालामाल केले असले तरी त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळंच स्थानिक क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी करणारा आकाश सिंह सलग चारवेळा दहावीच्या परिक्षेत नापास झाला. मात्र त्यानंतर त्यानं एकही धाव न देता 10 विकेट घेतल्यामुळं घरच्यांनी त्याला माफ केले होते. आता हाच आकाश सिंह आयपीएलमध्ये दिग्गजांबरोबर खेळण्यास सज्ज आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 18, 2020, 2:07 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या