राजस्थान, 12 ऑगस्ट : कोरोनामुळे स्थगिती देण्यात आलेली आयपीएल स्पर्धा अखेर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयनं ही स्पर्धा युएइमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्स संघाचा फिल्डिंग कोच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली, यात फिल्डिंग कोट दिशांत त्यागनिक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तर, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. याबाबत राजस्थान रॉयल्स संघाने पोस्ट करत माहिती दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या काळात युएइमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत नियम कडक असणार आहे. बीसीसीआयनं यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार आहे. लवकरच सर्व खेळाडूंना ही नियमावली पाठवण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार बायोसेफ्टी सुरक्षा खेळाडूंना पुरवण्यात येणार आहे. या अंतर्गत खेळाडू कोणतेही नियम मोडू शकत नाही. तसेच, खेळाडू आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सोबत ठेवू शकतात की नाही, याबाबत विचार सुरू आहे.
वाचा-तब्बल एका वर्षानंतर 'या' दिवशी मैदानात उतरणार धोनी, CSK ने सांगितली तारीख
Our fielding coach @Dishantyagnik77 has tested positive for COVID-19 in an extra round of testing done by the franchise. All other franchise members have tested negative to date. Full statement below.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 12, 2020
वाचा-12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज! सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन
असे असणार नियम
खेळाडूंना 14 दिवसात चारवेळा कोव्हिड-19 चाचणी करावी लागणार आहे. पहिल्या दोन चाचण्या या युएइ जाण्याआधी करण्यात येणार आहेत. त्यानंतर युएइमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर कराव्या लागणार आहेत. संघांना एकवेळा हॉटेल निश्चित करून दिल्यानंतर त्यांना हॉटेल बदलण्याची मुभा नसेल. बीसीसीआय निर्णय घेईल की कोविड चाचणीत निगेटिव्ह आलेले केटररच खेळाडूंना जेवण देतील. बाकीच्या नियमांनुसार डगआऊटमध्ये कमी लोकांना बसण्याची परवानगी असेल तर ड्रेसिंग रूममध्ये फक्त 15 खेळाडू असतील.