Home /News /sport /

कोरोनामुक्त झालेले खेळाडू कधीच फिट होणार नाहीत? मेडिकल रिपोर्टनं वाढवली CSKची चिंता

कोरोनामुक्त झालेले खेळाडू कधीच फिट होणार नाहीत? मेडिकल रिपोर्टनं वाढवली CSKची चिंता

मेडिकल एक्सपर्टनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही ते पूर्णत: निरोगी होणार नाहीत. सध्या जगभरातील खेळाडूंवर रिसर्च केला जात आहे.

    नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : आयपीएल 2020च्या तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, याआधीच आयपीएलवर सध्या कोरोनाचे (Coronavirus) संकट आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाच्या 2 खेळाडूंसह 11 स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. दीपक चाहर (Deepak Chahar) आणि ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर क्रिकेटविश्व हादरून निघालं आहे. हे दोन्ही खेळाडू फिट झाले असले तरी मेडिकल एक्सपर्टनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही ते पूर्णत: निरोगी होणार नाहीत. सध्या जगभरातील खेळाडूंवर रिसर्च केला जात आहे. वाचा-CSKनंतर आता 'या' संघाला कोरोनाचा धोका, मुख्य सदस्य निघाला पॉझिटिव्ह खेळाडूंच्या फुफ्फुस आणि हृदयावर होत आहे परिणाम बीसीसीआयच्या सुत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत, कारडिया टेस्ट केल्यानंतर दिसून येत आहे की, खेळाडू किती वेळात रिकव्हर होत आहे आणि व्हायरस किती प्रमाणात शरीरात राहतो, याबाबत माहिती मिळेल. काही रिपोर्टनुसार, खेळाडूंच्या फुफ्फुसांवर कोरोनाचा परिणाम जास्त दिसत असल्याचे दिसून आले होते. काही प्रकरणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह नसलेल्या खेळाडूंच्या हृदयावरही परिणाम होत असल्याचे दिसून आले. वाचा-IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडू वापरणार एक विशेष डिव्हाइस, असं करेल काम! खेळाडूंना 15 दिवस रहावे लागणार क्वारंटाइन यावेळी आयपीएल अतिशय उच्च तापमानात खेळला जाईल. आयपीएलमधील खेळाडूंवर खूप दबाव असेल. या काळात वेगवान गोलंदाज ज्या दबावाचा सामना करीत आहे त्यामुळे कोरोनातून सावरल्यानंतर त्यांची शरीर कसे काम करेल याची माहिती नाही आहे. खेळाडूंच्या म्हणण्यानुसार निगेटिव्ह रिपोर्ट येऊनही त्यांना किमान दोन आठवडे क्वारंटाइन ठेवणे आवश्यक आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या