स्पोर्ट्स

  • associate partner

आजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर!

आजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर!

फलंदाजीपासून-गोलंदाजीपर्यंत वाचा12 वर्षातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर.

  • Share this:

दुबई, 19 सप्टेंबर : क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या IPLमध्ये अनेक व्रिकम झाले आहेत. मागील 12 वर्षांच्या IPLच्या कारकिर्दीत असंख्य अनपेक्षित असे विक्रम नोंदवले गेले आहेत. यंदा कोरोनाच्या संकटात भारताबाहेर IPL आयोजित करण्यात आले आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) यांच्यात शेख जैयाद क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे.

षटकारांची आतषबाजी, शेवटच्या षटकापर्यंत अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत जाणारा प्रत्येक सामना आणि वाढत जाणारी उत्सुकता यामुळे आयपीएलची अनेक दिवसांपासून सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाय बऱ्याच अंतराने खेळाडूही मैदानावर उतरण्यास उत्सुक आहेत. नवीन विक्रम होण्याच्या तयारीत आहेत. अशाच काही चर्चेत असणाऱ्या विक्रमांवर एक नजर टाकुयात...

सर्वात जास्त षटकार

ख्रिस गेल, ए बी़ डिव्हिलियर्स, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना ही काही तडाखेबाज फलंदाजांची यादी आहे. ही यादी मोठी असली तरी प्रामुख्याने हीच नावे सर्वांसमोर असतात. यात सर्वाधिक षटकांरांचा विचार केला तर 357 षटकारांसह एबी प्रथम क्रमांकावर असून गेल व धोनीने अनुक्रमे 323 आणि 297 षटकार लगावले आहे .

सुपर ओव्हर

सुपर ओव्हरचा प्रत्येक सामना थरारक झाला आहे. गेल्या बारा वर्षात आठ सामने सुपर ओव्हरपर्यंत गेले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक तीन सुपर ओव्हर सामने खेळले आहेत. चेन्नई आणि कोलकात्याला यात एकही विजय नोंदवता आलेला नाही.

सर्वाधिक धावा

सर्वाधिक धावांमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली हा 5 हजार 412 रन बनवून प्रथम स्थानावर आहे. तर सुरेश रैना याने 5 हजार 368 धावा केल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक विकेट

लसिथ मलिंगा याने सर्वाधिक 170 बळी घेतले आहेत. त्यानंतर अमित मिश्रा (157) आणि हरभजन सिंग (150) यांचा क्रमांक लागतो.

सर्वात जलद अर्धशतक

के.एल. राहुलच्या नावावर अवघ्या 14 चेंडुत अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. राहुलनं 2018मध्ये ही कामगिरी केली होती. राहुलनंतर युसूफ पठाण आणि सुनील नारायण यांचा क्रमांक लागतो.

बेस्ट बॉलिंग

मुंबईच्या अल्जारी जोसेफ याने हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात 3.4 ओव्हरमध्ये 12 धावा सहा बळी घेऊन विक्रम नोंदवला आहे. सोहेल तनवरने 14 धावा देत विकेट घेतल्या होत्या.

सर्वात जास्त हॅटट्रीक

अमित मिश्रा याने सर्वाधिक तीन वेळा हॅटट्रीक नोंदवली आहे. मिश्राने 147 सामन्यात 3 हॅटट्रीक घेतल्या आहेत.

सर्वात जास्त मेडन

प्रविण कुमार याच्या नावावर सर्वाधिक 14 मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम आहे. तर इरफान पठाणनं 10 आणि धवन कुलकर्णीने 8 मेडन ओव्हर टाकले होते.

सर्वात जास्त धावा

ख्रीस गेल हा आयपीएलचा विक्रमादित्य म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक सहा शतके, पुणे वॉरियर्स विरुद्ध 66 चेंडूत 175 धावांची नाबाद मोठी खेळी असे काही मोठे विक्रम त्याच्या नावावर आहेत.

सर्वात मोठा विजय

आजपर्यंतच्या IPL 2017 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सला मुंबईने तब्बल 146 धावांनी पराभूत केले होते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.

सर्वाधिक धावा

सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. आरसीबीने 2013 मध्ये पुणे वॉरियर्स विरोधात 263 धावा केल्या होत्या.

Published by: Priyanka Gawde
First published: September 19, 2020, 7:23 AM IST

ताज्या बातम्या