वाचा-विराट, रोहित आणि धोनीला टक्कर देणार 'हे' 7 युवा खेळाडू! पदार्पणातच गाजवणार IPL मलिंगाचा आयपीएलमध्ये शानदार रेकॉर्ड मलिंगा 2009पासून मुंबई संघात आहे. 2018मध्ये गोलंदाज प्रशिक्षक म्हणूनही तो संघासोबत होता. गेल्यावर्षी मलिंगावर 2 कोटींची बोली लावून त्याला संघात पुन्हा घेण्यात आले. आयपीएलमध्ये मलिंगाने 122 सामने खेळले आहेत. यात त्यानं 170 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.14 आहे. गेल्या वर्षी झालेल्या अंतिम सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये मलिंगाने सामना फिरवला आणि चेन्नईच्या तोंडचा घास पळवत मुंबईला विजय मिळवून दिला. त्यामुळे यंदा मलिंगाचे यॉर्कर मुंबईचे चाहते मिस करतील. वाचा-धोनीसोबत खरच वाद झाला होता? 'त्या' प्रकरणाबाबत सुरेश रैनानं केला खुलासा जेम्स पॅटिंसनचा रेकॉर्ड जेम्स हा जबदरदस्त जलद गोलंदाज आहे. जेम्सनं 39 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्यानं 47 विकेट घेतल्या आहेत. जेम्सचा इकॉनॉमी रेट 8.25 आहे. गेल्या काही वर्षांपासून दुखापतींमुळे पॅटिंसन ऑस्ट्रेलियन संघाबाहेर होता. पॅटिंसनने आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai Indians