स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 दरम्यान तब्बल 20,000 कोरोना टेस्ट करण्याची तयारी! असा आहे नवा मेडिकल प्लॅन

IPL 2020 दरम्यान तब्बल 20,000 कोरोना टेस्ट करण्याची तयारी! असा आहे नवा मेडिकल प्लॅन

खेळाडूंच्या सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नसून याआधी जेव्हा खेळाडू दुबईमध्ये पोहोचले होते तेव्हा प्रत्येकाला सहा दिवसांचा आयसोलेशन कालावधी अनिवार्य करण्यात आला होता.

  • Share this:

दुबई, 11 सप्टेंबर: कोरोनाच्या या संकटाचा सर्वच क्रीडा स्पर्धांना मोठा फटका बसला आहे. अनेक स्पर्धा रद्द देखील कराव्या लागल्या आहेत. यामध्ये जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलला (IPL 2020) देखील फटका बसला आहे. दरवर्षी भारतात आयोजित होणारी ही स्पर्धा या वर्षी युएईमध्ये आयोजित केली गेली आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएई मधील 3 शहरांत खेळवली जाणार आहे. यामधील 24 सामने दुबई, 20 अबुधाबी आणि 12 शारजाहमध्ये आयोजित केले जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

स्पर्धेच्या महिनाभर आधी सर्वच संघानी दुबईला जात सराव सुरू देखील केला होता. मात्र अनेक संघाना याचा फटका बसला असून काही खेळाडू कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. मात्र त्यानंतर आता आयपीएलने काळजी घेतली असून स्पर्धेच्या काळात देखील मोठी खबरदारी घेतली जाणार आहे.

वाचा-CSKसाठी मोठी बातमी, दीपक चाहरचा दुसरा कोरोना रिपोर्ट आला समोर

खेळाडू आणि सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी होत असून स्पर्धेच्या दरम्यान जवळपास 20,000 कोरोना टेस्ट होणार असल्याची माहिती मिळाली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नसून याआधी जेव्हा खेळाडू दुबईमध्ये पोहोचले होते तेव्हा प्रत्येकाला सहा दिवसांचा आयसोलेशन कालावधी अनिवार्य करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना शहरात प्रवेश देण्यात आला होता. यामुळे दुबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात येत असून संघातील खेळाडूंबरोबरच सपोर्ट स्टाफ, अंपायर, संघाचे पदाधिकारी आणि इतर व्यक्तींना देखील हे नियम पाळावे लागणार आहेत.

वाचा-कोरोनाला घाबरले दिग्गज खेळाडू? आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतली IPLमधून माघार

आयपीएलचे मेडिकल पार्टनर असेलल्या VPS healthcare ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 3500 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान 20 हजार टेस्ट करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंना देखील कडक नियम असून केवळ हॉटेल ते स्टेडियम अशीच प्रवास करण्याची परवानगी खेळाडूंना आहे.

वाचा-कंगाल झालेल्या टीमला विकत घेऊन 'या' कंपनीने केलं IPL चॅम्पियन

चेन्नई सुपर किंग्सचे 11 खेळाडू पॉजिटीव्ह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनावर देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे अनेक खेळाडूंनी वैयक्तिक कारण देत स्पर्धेतून माघार देखील घेतली आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांचा समावेश आहे. त्याचबरोबरमुं बई इंडियन्सचे लसिथ मलिंगा आणि दिल्ली कपिटल्सचा जेसन रॉय यांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 11, 2020, 12:09 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading